कोल्हापुर : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सकाळी सकाळी इडी आणि आयकर विभागाने धाड टाकली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेची लहर उठली आहे. कारण अगोदर राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून किरण पाटील, राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंची चर्चा
हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी ईडी आणि आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. आज सकाळी इडी आणि आयकर विभागाचे 20 अधिकारी आज पहाटे 6 : 30 वाजता हसन मुश्रीफ यांच्या घरी आले. या सर्वांनी सकाळपासूनच मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. तसेच त्यांच्या घराभोवती सुरक्षा जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अजूनही आयकर विभाग आणि इडीची तपासणी सुरू आहे.
“राज्याची तिजोरी लुटण्याचं काम सध्या इडी सरकारकडून सुरूय”
भाजप नेते किरीट सोमय्यांनी नव वर्षाच्या सुरूवातीलाच हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला होता. त्यात किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटीचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप लावला आहे. तसेच त्यांच्याच संबंधित कोल्हापुरातील अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात 100 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मंत्री असतांना ग्रामविकास खात्यात टेंडर जावयाच्या कंपनीला देऊन 1500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
“सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख”, अजित पवारांचं राजकीय घडामोडींवर भाष्य
दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई केल्यानंतर मुश्रीफ समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे. तसेच आज भाजप नेते किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार असून त्यावर भाष्य करणार आहेत.
Read also
- “डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत, बच्चू कडू यांना अपघात, दुचाकीस्वाराने उडवले”
- “स्वप्नभंग झालेल्या आमदारांची आता मंत्रिमंडळ विस्ताराची आशा मावळली”
- शिवसेना नेमकी कुणाची? तोपर्यंत धनुष्यबाणांवर सुनावणी घेऊ नका, ठाकरे गटाच्या वकिलाचा युक्तिवाद
- “मी भजन जरी गायलं तरी लोक मला ट्रोल करतील, त्यामुळे मी..;” अमृता फडणवीस
- “हो मी उपटसुंभ, पवार कुटुंबाला उपटून टाकणार”; पडळकरांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले