मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जवळपास एक ते दीड महिना उलटून गेल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नव्हता. त्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर सातत्याने टिका केली. तसेच आज एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा छोटेखानी शपथविधी होणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटातून 9 तर भाजपकडून 9 असे एकूण 18 मंत्री शपथ घेणार आहेत.
“अगोदर जहरी टिका त्यानंतर कौतूक”; रोहित पवारांचं मुख्यमंत्र्याबाबत नेमकं चाललंय काय?
भाजपकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा, रविंद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, दिपक केसरकर, अब्दुल सत्तार, दादा भुसे, तानाजी सावंत, संजय राठोड, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील दादा भुसे, विजय कुमार गावित यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. राजभवनात आज राज्यातील सर्वच पक्षातील नेते हजर आहेत.
मंत्रीपद अन् महामंडळासाठी महादेव जानकर आग्रही; शिंदे सरकारमधील मंत्रीपदे अजूनही गुलदस्त्यात
गांधीची भारत छोडो नारा दिला होता. या जागेवरून सुरूवात केली होती म्हणून या जागेला महत्व आहे म्हणून अभिवादन करायला आलो आहे. 11 वाजता विस्तार आहे. फडणवीस यांनी मला फोन केला निमंत्रण आले होते. मी जाणार आहे. विस्तार होतो तेव्हा नाराजी होते. फुलफ्रेम मंत्रीमंडळ नाही आहे. अधिवसेन पार पाडण्यासाठी छोटेखाणी विस्तार आहे. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
“तर माझ्यावर बिनधास्त कारवाई करा,” अब्दुल सत्तार यांचं ओपन चॅलेंज
दरम्यान, येत्या 10 ऑगस्टपासून राज्यात पावसाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळे या अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारचं चांगलाचं कस लागणार आहे. कारण गेल्या एक महिन्यापासून मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून विरोधी पक्ष त्यांच्यावर सातत्याने टिका करीत होते.
Read also
- औरंगाबादमधील 6 आमदारांनी सो़डली साथ, ठाकरेंकडून आंबादास दानवेंना मोठी जबाबदारी
- “इसलिये में करता रहा काँग्रेस पे वार”; आठवलेंनी सादर केली संसदेत कविता
- “मंत्रिमंडळ विस्ताराचं कोणतंही निमंत्रण आलं नाही”; अजित पवारांचं स्पष्टीकरण
- आजोबा भिजले, नातूही भिजले पण काय उपयोग? ‘त्या’ फोटोवरून खोतांचा रोहित पवारांना टोला
- मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहुर्त ठरला.. उद्या शपथविधी होणार?