मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केला व भाजप सोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊन देखील अजुन मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसल्याने विरोधी पक्षाकडून वारंवार शिंदे-फडणवीस सरकरावर टीका केली जात आहे. काही माध्यमांच्या माहिती नुसार उद्या मंत्रिमंडळातील काही आमदारांचा शपथविधी होणार असल्याचं बोललं जात आहे.
मंत्रीपद अन् महामंडळासाठी महादेव जानकर आग्रही; शिंदे सरकारमधील मंत्रीपदे अजूनही गुलदस्त्यात
विधानपरिषदेत शिंदे सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज होती. हे काम अंबादास दानवे करू शकतील. अंबादास दानवे हे आक्रमक व अभ्यासु नेता म्हणुन ओळख आहे. संसदीय आयुधांचा योग्य वापर करून ते सरकारला अडचणीत आणू शकतात. मराठवाड्यातील नव्या दमाच्या नेत्याला संधी देऊन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारला अडचणीत आणण्यासाठी डाव टाकला आहे.
“तर माझ्यावर बिनधास्त कारवाई करा,” अब्दुल सत्तार यांचं ओपन चॅलेंज
राज्यातील सत्ता गमवल्यानंतर शिवसेनेेने विधानपरिषदेतील विरेधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी हालचालींना सुरूवात केली आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर मराठवाड्यातील शिवसेना नेते अंबादास दानवे यांची वर्णी लावावी. अशा आशयाचं पत्र शिवसेनेने विधान परिषदेच्या सभापतींना पठवलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेनेने दावा सांगितला होता. आज याबाबत उद्धव ठाकरे यांनी सभापतींना पत्र लिहुन अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर वर्णी लावावी अशी शिफरस केली आहे.
“भाजपची सत्ता जसजशी आली, तसतशी प्रगतीची चाकं उलटी फिरायला लागली”
विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते मिळावं यासाठी आमदार अंबादास दानवे यांच्याबरोबर सचिन अहिर, मनीषा कायंदे इच्छुक होत्या. अंबादास दानवे यांचा आक्रमक स्वभाव आणि फर्डी भाषणकला तसेच त्यांचं विधान परिषदेतील काम लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांना विरोधी पक्षनेतेपदी संधी दिली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील 6 आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. दानवेंना विरोधी पक्षनेते पद देऊन मराठवाड्यात दानवेंच्या रूपाने शिवसेनेला बळ देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
Read also
- “इसलिये में करता रहा काँग्रेस पे वार”; आठवलेंनी सादर केली संसदेत कविता
- “मंत्रिमंडळ विस्ताराचं कोणतंही निमंत्रण आलं नाही”; अजित पवारांचं स्पष्टीकरण
- आजोबा भिजले, नातूही भिजले पण काय उपयोग? ‘त्या’ फोटोवरून खोतांचा रोहित पवारांना टोला
- मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहुर्त ठरला.. उद्या शपथविधी होणार?
- “अगोदर जहरी टिका त्यानंतर कौतूक”; रोहित पवारांचं मुख्यमंत्र्याबाबत नेमकं चाललंय काय?