पुणे : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील पोलीस पदोन्नतीबाबत एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. पोलिस दलात दाखल झालेला प्रत्येक पोलीस शिपाई पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून निवृत्त होईल, अशी योजना आखली असल्याच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी वळसे पाटील हे पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पोलीस दलाबाबत महत्वाची घोषणा केली आहे.
“अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व”, काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने उडवली खिल्ली
पुणे ग्रामीण पोलिस दलाच्यावतीने कल्याण शाखेमार्फत पोलिस मुख्यालय पुणे ग्रामीणच्या आवारामध्ये उभारण्यात आलेल्या पाषाण रस्ता आणि बाणेर रस्ता या दोन पेट्रोल पंपाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना ‘वळसे पाटील यांनी पोलीस पदोन्नतीबाबत बाबत माहिती दिली आहे.
बचावाला येणाऱ्यांनाचं पोलिसांनी बसवून ठेवलयं, मारेकरी अद्याप मोकाट; चित्रा वाघ संतापल्या
गृहमंत्री वळसे पाटील यांनी यावेळी माहिती दिली आहे की,‘राज्यातील पोलिस दलात शिपाई म्हणून दाखल झालेल्या शिपायाला पोलीस उपनिरीक्षक (PSI) पर्यंत पदोन्नती मिळविण्यासाठी अधिक वेळ वाट पाहावी लागते. तर काही पोलीस शिपाई वयानुसार त्यापूर्वीच निवृत्त होतात. मात्र, पोलिस दलात दाखल झालेला प्रत्येक शिपाई पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून निवृत्त होईल, अशी योजना आखली आहे. त्यामुळे राज्य सरकारवर फार आर्थिक भार वाढणार नाही. याबाबतचा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. तसेच, नंतर ‘या प्रस्तावाबाबत एकत्र बसून निश्चीत चर्चा करू, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वळसे पाटील यांना सांगितलं आहे.
Read Also :
- पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्याला पोलिसांनी घातल्या बेडया!
- गोकुळ मध्ये सत्ता बंटी पाटलांची मात्र सर्व ठेकेदारी महाडिकांची
- बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध
- शिवसेना नेते सुभाष देसाईंच्या खात्यात भ्रष्टाचार? नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना ‘लेटरबॉम्ब’
- जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील याचिकेवर ६ जुलै रोजी होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी