सोलापूर : गोपीचंद पडळकर गुरुवारी घोंगडी बैठकीसाठी शहरात आले होते.यावेळी त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत, “काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. त्यामुळे मी त्यांना मोठे मानत नाही. तुम्ही कोण मानत असाल, तर तो तुमचा प्रश्न आहे”, अशी बोचरी टीका केली होती. यांनतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आणि श्रीशैल नगर येथे त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, यात त्यांच्या गाडीच्या काचेचं नुकसान झालं. या घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, त्यांनी राष्ट्रवादीचं सोलापूरमधील कार्यालयावर हल्ला चढवला आणि ते फोडलं.
त्यानंतर, दगडफेकीच्या घटनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह १० ते १५ जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पडळकर यांनी प्रतिप्रश्न करताना पुणे आणि पंढरपुरात हजारोंची गर्दी करणारे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पडळकर यांनी केली. दरम्यान, यांनतर पोलिसांनी हल्ल्या प्रकरणात २ अज्ञात आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि दोन्ही आरोपींची ओळख पटवून, पोलीस पथकामार्फत त्यांचे शोधकार्य सुरू होते.
गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं सोलापुरचं कार्यालय फोडलं
प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्याही दबेल…
घोंगडी बैठका सुरूच राहणार… pic.twitter.com/909jRWb389
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) June 30, 2021
दरम्यान, आज सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी, पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या ‘त्या’ २ तरुणांना ताब्यात घेतले असून, गेल्या ३ दिवसांपासून दगडफेक करणारा तरुण अमित सुरवसे आणि त्याचा साथीदार निलेश क्षीरसागर हे फरार होते. अखेर आज त्यांना, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिपरगा येथुन शनिवारी दु. ताब्यात घेण्यात आले असून, अमित सुरवसे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे की नाही? त्याने हे पाऊल कुणाच्या सांगण्यावरून उचलले?, याबाबत त्याच्याकडे पोलीस चौकशी करत असल्याची माहिती, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली आहे.
Read Also :
- गोकुळ मध्ये सत्ता बंटी पाटलांची मात्र सर्व ठेकेदारी महाडिकांची
- बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध
- शिवसेना नेते सुभाष देसाईंच्या खात्यात भ्रष्टाचार? नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना ‘लेटरबॉम्ब’
- जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील याचिकेवर ६ जुलै रोजी होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- बचावाला येणाऱ्यांनाचं पोलिसांनी बसवून ठेवलयं, मारेकरी अद्याप मोकाट; चित्रा वाघ संतापल्या६