मुंबई : खासदार भावना गवळी यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर त्या प्रथमच आपल्या मतदारसंघात आल्या होत्या. यावेळी त्यांनी मोठ्या संख्यने शक्तिप्रदर्शन करीत यवतमाळ जिल्ह्यात कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवेसेनेचे अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते. येणाऱ्या निवडणुकीत भावना गवळी यांना निवडून आणण्यात आम्ही देखील मदत करू असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
“माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो”
भावना गवळी यांचं शक्ती प्रदर्शन नव्हतं तर ते लोकांचं प्रेम आहे. भावना गवळी यांच्या मागे प्रचंड जनता उभी आहे. याच्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, शिवसेनेच्या खासदाराच्या पाठीशी भाजप उभी राहिल. तसेच त्यांना निवडून आणण्यासाठी मदत करेल. भावना गवळी यांच्या सर्व गोष्टी न्याय प्रविष्ट आहे. न्यायालयाने त्यांना दिलासा दिला असेल तर त्याचं स्वागत आहे.
“माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, माझ्याकडे विचार आहे”; राज ठाकरेंचा शिंदे- उद्धव ठाकरेंना टोला
भावना गवळी यांनी बोलवलं होतं, म्हणून त्यांच्या मेळाव्याला आम्ही हजेरी लावली होती. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सरकारच्या माध्यमातून सरकारचे काम पोहचविण्याचे करणार आहे. पुढच्या 2 वर्षात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहोत. आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर 50-50 बिस्किट दाखवत आंदोलने केले. त्यावर देखील शिंदे यांनी भाष्य केलं.
आदित्य ठाकरे यांनी जे काही केलं आहे. त्यात लोकांना रस राहिला नाही. लोकांसाठी काय केलं, काय करू शकतो, तो उवापोह महाराष्ट्राच्या लोकांसमोर केला पाहिजे. त्या पायऱ्यावरती 50-50 गद्दार खोके है म्हणून चालणार नाही. अडीच वर्ष तुम्ही काय केलं याचा लेखाजोखा त्यांनी मांडला पाहिजे असंदेखील शिंदे म्हणाले. आजचं हे शक्तिप्रदर्शन आहे, असं मी म्हणत नाही. गेल्या 24 ते 25 वर्षापासून मी या मतदारसंघात काम करत आहे. या मतदारसंघातुन खासदार म्हणुन पाच वेळा निवडून आली आहे. हे जनतेचं प्रेम, जिव्हाळा आहे. हा मेळावा म्हणजे शिंदे-भाजप युतीचं एकत्रीकरण आहे. जनतेचं काम झालं पाहिजे. या दृष्टीकोनातुन हा मेळावा होता. राज्यात युती सरकार जनतेची कामे करण्यास सक्षम आहे, असं भावना गवळी म्हणाल्या.
Read also
- “अनिल देशमुखांची काय चुक होती? त्यांनी तर शिक्षणासाठी 100 कोटी घेतले होते”; शरद पवार
- खिशाला परवडणारं पूर्णब्रम्ह, या मेन्यू ला तोड नाही! अमोल कोल्हेंची जागतिक वडापाव दिनी खास पोस्ट
- “नरेंद्र मोदींना बांधलेल्या राखीचा विपरीत अर्थ कोणी काढु नये”
- “सोन्याची अंडी देणारी कोंबडी, शिवसेनेने गेल्या पंचवीस वर्षांपासून गिळली”
- “दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला, आता हे मंगळागौरीला पण देतील”; राज ठाकरेंचा शिदेंना टोमणा