मुंबई : अनेक राजकीय घडामोडी घडल्यानंतर अखेर पोलिसांनी महाविकास आघाडीच्या उद्यो होणाऱ्या मोर्चाला परवानगी दिली आहे. परंतु या मोर्चासाठी पोलिसांनी महाविकास आघाडीसमोर काही अटी शर्ती ठेवल्या आहेत. त्या अटीशर्तीचं पालनं करणं महाविकास आघाडीला आवश्यक असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
“मग तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबईतील कुडास कंपनीपासून ते टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत मोर्चाला परवानगी दिली आहे. तर या मोर्चासाठी राज्यातील तब्बल अडीच हजार पोलीस तैन्यात करण्यात येणार आहे. तसेच महाविकास आघाडीकडून या मोर्चासाठी खास टी-शर्ट छापण्यात आले असून समोर महाविकास आघाडीचा महामोर्चा तर पाठीमागे हॅशटॅग हल्लाबोल असं टि-शर्टवर छापण्यात आलं आहे. यातच कुडास कंपनीजवळ महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पाहणी देखील करण्यात आली आहे.
“पुण्यात बायको दुसऱ्या सोबत पळून गेली मग…;” शरद पवारांना धमकी दिलेल्या आरोपीची कबुली
महाविकास आघाडीच्या महामोर्चाला तब्बल 14 अटी घालण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपने संजय राऊत माफी मांगो आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे उद्या महाविकास आघाडी आणि भाजपचे आमनेसामने येण्याची शक्यता असून त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“हा सर्व मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रकार सुरू आहे का ?” अन् अजित पवार संतापले
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा ढिसाळ कारभार, महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महापुरूषांविषयी सत्ताधाऱ्यांच्या बेताल वक्तव्यावतून त्यांचा केलेला अवमान, वाढती बेरोजगारी आणि त्याला कारणीभूत परराज्यात जाणारे प्रकल्प अशा असंख्या गोष्टींचा जाब या अकार्यक्षम राज्य सरकारला विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यामातून महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल मोर्चा पुकारण्यात आला आहे.
Read also
- “गुजरात जिंकल्याने भाजपचा हेतू साध्य, आता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राला द्या”
- हल्लाबोल…! महामोर्चाची जोरदार तयारी, टी-शर्ट, बॅनर, अन् आज धमाकेदार टिजर रिलीज
- “मनुस्मृति जागी झाली अन् हे पुन्हा एकदा पिसाळले”; अंधारेंच्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचा भाजपवर घणाघात
- “त्याचे काय परिणाम होतात हे चित्रा वाघ यांना दिसेल,” मेहबुब शेखांचा चित्रा वाघ यांच्यावर सुचक वक्तव्य
- “वारकऱ्यांनो सावध रहा..! वारकऱ्यांमध्ये घुसलेला भाजपचा तुषार भोसले हा सुपारीबाज”