मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात अनेक शिवसैनिक प्रवेश करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेल्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. शिंदे गटात या ज्येष्ठ नेत्यांना सामिल करून घेण्याचा शिंदे यांचा डाव असल्याचं बोलल जात आहे. यातच आता शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनाही शिंदे गटात सामील करुन घेण्यासाठी दिल्लीत खलबतं सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांना धक्का देत एकनाथ शिंदे अर्जुन खोतकर यांना आपल्या गटात सामील करून घेणार का? हे पाहणे महात्वाचे असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आनंदावर पाणी फेरलं; आगामी काही निवडणुकां ओबीसी आरक्षणाशिवाय
अब्दुल सत्तार आणि यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीतील निवास स्थानी अर्जुन खोतकर यांची भेट घेतली. मानधरणी करून खोतकर यांना शिंदे गटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बोलले जात आहे. याआधी अर्जुन खोतकर यांची भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत भेट घेतली होती. यानंतर खोतकर शिंदे गटात जाणार असल्याचं बोललं जात होत. मात्र यावर मी शिवसेनेतच असल्याचं खोतकर यांनी सांगितले आहे.
शिंदे गटाला मोठा धक्का! बंडखोर खासदाराच्या घटस्फोटीत पतीचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
अर्जुन खोतकर 31 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सिल्लोडच्या सभेत शिंदे गटात येतील. त्यांचे व आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आमची लोकसभा एकच असल्याने दोघांनी एकत्र काम केल्यास राजकीय फायदा होऊ शकतो. अंतिम चर्चा आमच्यात व्हायची आहे. दानवे, खोतकर आणि आम्ही तिघे एकत्र येत पुढील वाटचाल कशी असेल यावर चर्चा करू. खोतकर आणि आमच्या जवळीक आहे, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
“उद्धव ठाकरेंनी नगरसेवक, आमदारकीसाठी उभं राहावं अन् निवडून दाखवावं”; दिपक केसरकर
मित्र, भाऊ, सहकारी म्हणून निश्चितपणे मी त्यांच्यासोबत यावं अशी अपेक्षा आहे. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम केले आहे. माझ्या मनात जो काही होते ते मी आधीच सांगितले आहे. आज अब्दुल सत्तार यांच्याशी बोलणे झाले आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून मी अंतिम निर्णय घेईन असं अर्जुन खोतकर म्हणाले.
Read also
- पुणे महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची आज सोडत; वाचा सविस्तर
- “संजय राऊत काय आहे,? हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहिती आहे”
- “मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी सारखं दिल्लीला जावं लागत, ही फार मोठी शोकांतिका”
- “स्मृती ताई, नको त्या विषयावर बेंबीच्या देठापासून बोलतात”
- एकनाथ शिंदे यांचे झंझावत दौरे; 30 जुलैपासून संपुर्ण महाराष्ट्र फिरणार