कोल्हापूर: कोल्हापुरातील गोकुळ जिल्हा दूध उत्पादक संघची निवडणूक Gokul Dudh Sangh Kolhapur नुकतीच झाली. पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या जोडगोळीने माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील गटाचा १७-४ असा धुव्वा उडवत गोकुळवर सत्ता स्थापित केली. तब्ब्ल ३० वर्षानंतर सत्तापालट करण्यात विरोधी गटाला यश आले. कोल्हापूर जिल्हा दुध संघ गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, नूतन संचालक मंडळ यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई इथल्या निवास्थानी भेट घेतली आहे.
हे पण वाचा, शेतकऱ्यांना 2 रुपये दरवाढ देणार, ‘गोकुळ’च्या विजयानंतर सतेज पाटलांची घोषणा
‘‘कारखान्याच्या सर्वांगीण हितासाठी आणि सभासदांच्या काळजीपोटीच मी सहकार पॅनलमध्ये’’; मदनराव मोहिते
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यावेळी उपस्थित होते. यावेळी दूध संघांच्या अनेक महत्वाच्या विषयांवर खासदार पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे. गोकुळला जेव्हा मुंबईत दूध विकण्यासाठी डेअरीची जागा हवी होती तेव्हा खासदार शरद पवार यांनी शब्द टाकत ताराबाई पार्क येथील शासकीय डेअरीची जागा गोकुळला मिळवून दिली होती. या भेटी दरम्यान शरद पवार यांनी गोकुळ सोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
हे पण वाचा, गोकुळच्या सत्ता परिवर्तनाचा आढावा: तब्ब्ल ५०० च्या वर ठरवधारक एकाच वेळी आणून बंटी पाटलांनी…
गोकुळचे नवीन संचालक: दिग्ग्ज नेत्यांचे वारस ते सर्वसामान्य कार्यकर्ते
गोकुळने महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाला संघटित करून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम केले आहे. राज्यातील इतर दूधसंघानी आदर्श घेण्यासारखे काम गोकुळचे आहे असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले आहे. गोकुळ आणखी उंची गाठू शकतो आणि अजून जास्त बहरू शकतो त्यामुळे तुम्ही सर्वानी आता तसे प्रयत्न करावे अशी भावना खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, मुंबईचे शाखाप्रमुख दयानंद पाटील उपस्थित होते.
हे पण वाचा, गोकुळच्या पहिल्याच बैठकीत जोरदार विरोध ; शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या सत्ताधिकाऱ्यांवर केली प्रश्नांची सरबत्ती
सतेज पाटील आणि हसन मुश्रिफांकडून गोकुळची झाडाझडती; अधिकाऱ्यांना धरले धारेवर