मुंबई : “खोट्या बाता, खोटी प्रतिमा, खोटी आश्वासने व खोटं गुजरात मॉडेल सगळं खोटं! मोदींची राजकीय इमारतच प्रोपागांडावर उभी आहे. त्यावर भूलून मत दिल्यावर हात रितेच राहणार. मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदीच म्हणाले की मोदींनी कधी चहा विकला नाही. पण स्वतःला चायवाला सांगून मोदींनी देशाला मूर्ख बनवलं!,” असा हल्लबोल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी, मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या एका वक्तव्याचा दाखला देत पंतप्रधान आणि भाजपवर केला आहे.
“मोठा भाऊ म्हणून केंद्राने जबाबदारी घ्यावी, भेदभाव न करता भरीव मदत द्यावी” – एकनाथ शिंदे
‘ऑल इंडिया फेअर प्राईझ शॉप’ या असोसिएशनचे प्रल्हाद मोदी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. आज ‘उल्हासनगर ट्रेड असोसिएशन’ च्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी, “मोदी ‘चायवाले’ नाहीत, आम्ही भावडांनी मिळून चहा विकला आहे, कारण आमचे वडील ‘चायवाले’ होते. त्यामुळे मोदींना ‘चायवाला’ म्हणणं चुकीचं आहे,” असं म्हटलं होतं, हाच धागा पकडून त्यांनी मोदींच्यावर निशाणा साधला आहे.
पंतप्रधानांनी यावेळी तरी महाराष्ट्रावरून घिरटी मारावी आणि गुजरातला देतात तशी तातडीची मदत द्यावी!
दरम्यान, या कार्यक्रमात, “उल्हासनगर शहर हे निर्वासितांचे शहर असून, शहराला राज्य सरकारने विशेष निधी द्यावा, अशी यावेळी व्यपाऱ्यांकडून करण्यात आली. यावर, “रेफ्युजी म्हणून किती दिवस रडणार? आता लढायला शिका,” असे सांगत प्रल्हाद मोदींनी, “शहराचा विकास होत नसेल आणि सरकारचे लक्ष वेधून घ्यायचे असेल, तर एकत्र येऊन जीएसटी भरायला नकार द्या, मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही तुमच्याकडे येतील,” असा हल्लाबोल सरकारवर केला आहे.
खोट्या बाता, खोटी प्रतिमा, खोटी आश्वासने व खोटं गुजरात मॉडेल सगळं खोटं!
मोदींची राजकीय इमारतच प्रोपागांडावर उभी आहे. त्यावर भूलून मत दिल्यावर हात रितेच राहणार. मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदीच म्हणाले की मोदींनी कधी चहा विकला नाही. पण स्वतःला चायवाला सांगून मोदींनी देशाला मूर्ख बनवलं!— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 31, 2021
Read Also :
- ‘मनसे-भाजपा युतीवर बोलण्यात काही अर्थ नाही’, विनोद तावडेंचं मोठं वक्तव्य
- “GST भरायला नकार द्या! मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही तुमच्याकडे येतील” – प्रल्हाद मोदी
- वीज बिलांची वसुली करा; पण, यशोमती ठाकूर म्हणतात…..
- हेरगिरीच्या आरोपावरुन संसदेत संपूर्ण आठवडा उलटूनही गदारोळ कायम, विरोधक आक्रमक
- पुण्यातील मेट्रो आमच्यामुळेच आली; श्रेयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपात झगडा-झगडी