नाशिक : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गोव्यात फोन टँपिंग होत असल्याचा आरोप केला. संजय राऊत यांचे सगळे आरोप भाजपने फेटाळून लावले आहेत. गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी देखील यावर आपलं मत व्यक्त केले आहे. अशातच आता या प्रकरणावरून भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी अजितदादांचं राज्यपालांना साकडं; कोश्यारी निर्णय घेणार?
गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, संजय राऊत यांच्या बोलण्याला काही किंमत नाही. ज्यावेळी राज्यात आमची सत्ता होती. तेव्हा संजय राऊत कुठे होते? हे कुणाला माहिती होतं का ? या आधी त्यांना कोणी ओळखत नव्हते. परंतु मागच्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून बोलायला लागल्याने त्यांना आता लोक विचारत आहेत. असा खोचक टोला ही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
आर्यन खान प्रकरणात शिवसेना, काँग्रेस मंत्र्यांचा समावेश; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा
शिवसेना आम्हाला सोडून जाण्यात संजय राऊत यांचाच मोठा हात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर तर लोकांमध्ये त्यांची थोडी ओळख निर्माण झाली. तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितले की आमच्या काळात फोन टँप झाले याबाबतचे कोणतेही पुरावे नाहीत. देशभरातील सर्व विरोधकांचे आता राऊत नाव घेतील. ते भंपक विधाने करतात. त्यांनी याबाबत पुरावे द्यावेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. सध्या फोन टँपिंगचा कार्यक्रम उत्तम सुरू आहे. गोव्यात शांतता फोन टँपिंग सुरू आहे. हा महाराष्ट्रा पँटर्न आहे, महाराष्ट्र पँटर्नचे जे प्रमुख होते तेच निवडणूक काळात गोव्याचे प्रमुख होते असा टोला ही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा आधारही आम्ही दिंगबर कामत यांना दिल्याचं संजय राऊत म्हणाले होते.
Read also:
- मध्यप्रदेशमधील प्रकरण टिकतयं तर, आमचंही प्रकरण टिकेल; वडेट्टीवारांची ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया
- मग नारायण राणेंचा राजीनामा का घेतला नाही, नवाब मलिकांवरील कारवाई अयोग्य- शरद पवार
- फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…
- गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे
- महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला