IMPIMP
bjp bjp

300 कोटींचे मालक असलेले अन्वय नाईक ४,५ कोटींसाठी आईसह आत्महत्या कशी करेल? भाजप नेते निलेश राणेंचा सवाल

मुंबई : अर्णब गोस्वामीला अटक केल्यानंतर आता सर्व भाजप नेते त्याच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत, काल राज्यभरात अर्नबच्या अटकेविरोधात आंदोलन केल्यानंतर आता भाजप नेते थेटपने महाराष्ट्र सरकारला लक्ष्य करताना अर्नबच्या समर्थानात उतरले आहेत. त्यातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी या खटल्यासंदर्भात मोठं विधाल करून खळबळ उडवून दिली आहे.

अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने ४-५ कोटीसाठी आत्महत्या करु शकेल असं मला वाटत नाही, 300 कोटींचा मालक आईसह आत्महत्या कशी करेल हा प्रश्न आहे? असा प्रश्न उपस्थित करत भाजप नेते निलेश राणे यांनी अर्णब गोस्वामी आणि अन्वय नाईक प्रकरणात मोठ विधान केले आहे.

 

अर्णब गोस्वामीला काल त्याला अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाची न्यायालयाकडे पोलिस कस्टडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आणि अर्णब गोस्वामी सह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार केल्याची अर्णब यांनी कोर्टाकडे केली होती. मात्र कोर्टाने कोर्टाने प्रथमदर्शनी पोलिसांकडून मारहाण झाल्याचे दिसत नसल्याचे सांगत न्यायलयाने त्यांची तक्रार फेटाळून लावली होती.

दरम्यान अर्णब गोस्वामींच्या अटकेमुळे आत सर्व भाजप नेते महाराष्ट्र सरकारला लक्ष्य करत असताना आता दिल्लीतून महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे, भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध करताना महाराष्ट्र सदनाबाहेर ‘आणीबाणीत स्वागत आहे’ आणीबाणी २.० अशा आशयाचे फलक लावले आहेत, आता यावरून एक नवीनच वादंग सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Read Also :

‘अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या कपड्यांवर दिसतायेत’, आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला

‘मंत्री यशोमती ठाकूर यांना मंत्रिपदावरून काढल्यास ठाकरेंना महाविकास आघाडी सरकार पडण्याची भीती’

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर ‘या’ कारणामुळे झळकले ‘आणीबाणीत स्वागत आहे’ चे पोस्टर

मुख्यमंत्री नितीश कुमारांनी ‘या’ कारणामुळे ‘फालतू बात’ म्हणत योगी आदित्यनाथांना झापले

ईव्हीएम मतदान यंत्र नव्हे तर ‘मोदी मतदान यंत्र’

‘सूडाच्या राजकारणासाठी मराठी बाणा आणि सोयीच्या राजकारणासाठी हिंदुत्व लाचारसेनेचा वाकलेला कणा’