सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. ते रविवारी खटाव येथील विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना खासदार उदयनराजे भोसले यांनी तुमच्या दौ-याबाबत टीका केल्याचे म्हटलं. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी मला काहीच बोलायचे नाही असे स्पष्ट केले.
ठाकरे सरकारच्या ३ सदस्यीय प्रभागरचनेला ग्रहण; मनसे न्यायालयात सोमवारी याचिका दाखल करणार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मला काहीच बोलयाचे नाही. मी काम करणारा माणूस आहे. मला बाकींच्या बद्दल काहीच बोलायचे नाही. माध्यमांचे प्रतिनिधी नेते मंडळींना विचारतात ते तुमच्या बद्दल असे बोलले. त्यानंतर पुन्हा दुस-या नेत्याला जाऊन विचारायचे ते तुमच्या बद्दल असे बोलले. मला विकासाशिवाय काहीच बोलायचे नाही असे पवारांनी नमूद केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा बाजीगर कोण? तीन ४३ च्या प्रभाग रचनेत कोणाच्या नाड्या आवळल्या जाणार?
जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत रामराजे नाईक-निंबाळकर, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील शशिकांत शिंदे हे त्याबाबत निर्णय घेतील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याची मुभा जिल्ह्यातील नेते मंडळींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देत असतो असे उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले.
Read Also :
- देवेंद्र फडणवीसांनी मराठवाडा पाहणी दौऱ्यातून बीडला वगळलं; पंकजा मुंडेंचे ट्विट कनेक्शन?
- ऑफिसच्या एसीत बसून मोठे लीडर झाले, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार? – फडणवीस
- अभ्यास नको, गप्पा मारा; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची वर्गात जाऊन भन्नाट सुरूवात
- देवेंद्र फडणवीसांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करता करता शिवसेना नेता फोडला; लवकरच होणार भाजप प्रवेश
- राज्यातील विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजपा सज्ज – चंद्रकांत पाटील