अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर काल शिवसैनिकांनी हल्ला केला. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आले असता त्यांची गाडी अडवण्याचा शिवसैनिकांकडून करण्यात आला. तसेच 50 खोके एकदम ओके असे नारे देखील देण्यात आले. शिवसैनिक आक्रमक झाल्याने संतोष बांगर यांनी त्याठिकाणाहून पळ काढला. यावर आता संतोष बांगर यांनी कडक इशारा दिला आहे.
“तर तुमचा धर्म घ्या अन् पाकिस्तानात चालते व्हा”; राज ठाकरेंचा इशारा
मी अमरावती दौऱ्यावर आल्यावर मी, माझी बायको आणि बहिण आम्ही तिघे देव दर्शनाला गेलो होतो. देवदर्शन करून बाहेर पडल्यानंतर दहा-पाच लोकांनी नारेबाजी करत माझ्या गाडीवर हाताने मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मला वाटतं की, याला हल्ला म्हणता येणार नाही. हल्ला कशाला म्हणतात? समोर येऊन कुणी वार करत असेल तर त्याला आपण हल्ला म्हणतो. हा चोरपणा आहे. असं संतोष बांगर यांनी म्हटलं आहे.
सोसायट्यांमध्ये स्वच्छतेला चालना देण्यासाठी ‘ नमो करंडक ‘ स्पर्धेचे आयोजन
पुर्वीच्या काळी डाका टाकला जायचा. डाका कशाला म्हणतात, तर घराच्या पुढे जाऊन फटाका लावायचा आणि सांगायचं की मी तुमच्या घरावर डाका टाकतोय. तो पुर्वीचा काळ होता. पण हे चोर प्रकरण आहे. हे मर्दानगीचं काम नव्हे. माझी बहिण आणि माझी पत्नी गाडीत नसती तर संतोष बांगर काय आहे. ? हे मी त्यांना सांगितलं असतं असंही देखील बांगरांनी सांगितलं आहे.
“सीतारमण यांची बारामतीत घराणेशाहीवर टिका, राष्ट्रवादीने भाजपची यादीच दिली”
दरम्यान, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून याचा निषेध व्यक्त केला जात आहे. हल्ला करणाऱ्यांवर कारवाई होणारच असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तर यातच अलिकडेच बंडखोर आमदार उदय सामंत यांच्यावर देखील पुण्यात शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे सध्या राज्यातील शिवसैनिक बंडखोर आमदारांवर नाराज असल्याचं दिसून येत आहे.
Read also
- “तर रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल”; मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून सावंताना राष्ट्रवादीचा इशारा
- “संजय शिरसाट यांची गुवाहाटी तर कडूंची सुरत जिल्ह्याच्या…;” राष्ट्रवादीने डिवचलं
- “अन्यथा शिवसैनिक शांत बसणार नाहीत”; शिवसेनेचा शिंदे सरकारला कडक इशारा
- “महाराष्ट्रातील जनता आता उद्धव ठाकरेंना सिरीयसली घेत नाही”; चंद्रशेखर बावनकुळे
- “आमच्या नेत्यांवर शितोंडे उडवाल तर नागडा करून मारू;” तानाजी सांवतांचा बीडमध्ये हल्लाबोल