मुंबई : आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक समीर वानखेडे विरोधात अनेक दावे ते करत आहेत. मलिकांच्या आरोपांना काल समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही हिंदूच आहोत हे देखील तिने ठासून सांगितलं. पण मलिक त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. दरम्यान नवाब मलिकांनी यावेळेस एक आव्हान केले आहे.
देवाकडून बंद होणारा ऑक्सिजन पुरवठा मीच सुरू केला, असंही उदयनराजे म्हणतील – शिवेंद्रराजेंचा घणाघात
मी आतापर्यंत समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम आहे. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा ठरल्यास मंत्रिपद सोडायला तयार आहे. मी केलेले आरोप खोटे ठरवून दाखवा, असं आव्हानच मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांना दिले आहे. मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी समीर दाऊद वानखेडे यांचा जो मुद्दा समोर आणत आहे तो त्याच्या धर्माचा नाही. ज्या फसव्या मार्गाने त्याने IRS ची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आणि त्यामुळे एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या भविष्यापासून वंचित ठेवले आहे, ते मला समोर आणायचे आहे, असं ट्विट करत बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे समीर वानखेडेंनी फसव्या मार्गाने नोकरी मिळवल्याचा मलिक यांनी म्हटलं आहे.
Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा pic.twitter.com/rjdOkPs4T6
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 25, 2021
आता समीर वानखेडे यांनी हिंदु असल्याचा दावा करत असताना मलिकांनी नवा खुलासा केला. ट्विटरवर त्यांनी गूड मॉर्निंग म्हणत समीर वानखेडेंचा पहिला निकाह झाला होता असं म्हटलं आहे. त्यांच्या या निकाहचे प्रमाणपत्र आणि फोटो देखील त्यांनी ट्विटरवर जाहीर केला आहे. एका तासापूर्वी मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो प्रदर्शित केला आहे, जो डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत निकाह केल्याचा आहे. म्हणजेच मलिक वारंवार हेच स्पष्ट करु इच्छित आहे की समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊदच आहे आणि ते मुस्लिमच आहेत.
Read Also :
- मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसाना जलयुक्त शिवार योजनेप्रकरणी ठाकरे सरकारकडून क्लीन चीट
- समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाबाबत नवाब मलिकांचा अजून एक गौप्यस्फोट; म्हणाले…
- विधानसभा अध्यक्षांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू; महाविकास आघाडीला आमदार फुटण्याची भीती!
- तपास अधिकाऱ्याची जात, धर्म काढणं योग्य नाही; आरोप लागले आहेत तर चौकशी करा – देवेंद्र फडणवीस
- महाविकास आघाडी सरकारने औकातीत राहावं, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; भाजप आमदाराने भरला दम