बीड: खासदार प्रीतम मुंडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळ विस्तारात जागा न दिल्यानं मुंडे समर्थकांमध्ये चांगलीच नाराजी निर्माण झालीय. त्यामुळेच बीडसह राज्यातील अनेक ठिकाणी मुंडे समर्थक भाजप पदाधिकारी आपल्या पक्षीय पदांचा राजीनामा देत आहेत.
हे पण वाचा: ‘नारायण राणेंपेक्षा संभाजीराजेंना मंत्री केलं असतं तर महाराष्ट्राचा सन्मान झाला असता’
हे पण वाचा: केंद्रीय मंत्रीमंडळात नारायण राणेंना स्थान, मुंडे भगीनींचे पंक छाटण्याचा प्रयत्न?
बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थक राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे राणे समर्थक नारायण राणे यांना मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदानिमित्त जल्लोष करताना दिसत आहेत. त्यामुळे हा जल्लोष मुंडे समर्थकांच्या जखमेवरील खपली काढण्याचा तर प्रकार नाही ना अशी चर्चा होतेय. त्यामुळे बीडमधील राजकीय पारा चांगलाच चढलाय.
हे पण वाचा: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलेल्या नारायण राणेंकडे कोणतं खातं?
हे पण वाचा: नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद देऊन, भाजपने खेळली मोठी राजकीय खेळी; नेमकं गणित काय? वाचा सविस्तर
बीडमध्ये नारायण राणे यांच्या काही समर्थकांनी रस्त्यावर गाडी उभी करत जोरदार घोषणाबाजी केली. यात ‘राणे साहेबांचा विजय असो’, ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’, ‘नरेंद्र भाई मोदी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘राणे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘निलेश राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच गुलाल उधळत, एकमेकांना गुलाल लावण्यात आला. इतकंच नाही, तर फटाक्यांची लडही फोडण्यात आली.
हे पण वाचा: नारायण राणेंना आमदार वैभव नाईकांचा धक्का; राणेंचे कट्टर समर्थक शिवसेनेच्या गोटात
हे पण वाचा: “ताकतच पहायची असेल तर…..”; नारायण राणेंच्या टीकेवर संभाजीराजेंचं प्रत्युत्तर
आयारामांना मंत्रीपद, निष्ठावंतांना धत्तुरा!
पक्ष वाढविण्यासाठी वाटेल ते! अशा पद्धतीने केंद्रातील सत्ताधारी भाजपचा कारभार चालू आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, संजय धोत्रे यांच्यासारख्या भाजपच्या निष्ठावंतांना डच्चू देत घरी बसवले. त्याचवेळी महाराष्ट्रातून पक्षाबाहेरून आलेले नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भारती पवार तर मध्य प्रदेशमधून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ घातली.