नागपूर: नागपूर शहरातील महाकाळकर भवन, कळमना मार्केट नागपूर येथील कार्यकर्ता मेळावा प्रसंगी खासदार मा. श्री प्रफुल पटेल व माजी गृहमंत्री मा. श्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी खासदार मा. श्री प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. पक्ष नेहमीच लोकभावनेचा विचार करुन सामान्य लोकांना संधी देणारा पक्ष आहे. आज झालेल्या पक्षप्रवेशामुळे नागपूर मध्ये पुन्हा नव्याने उभारी घेण्याचे काम आपण एकत्र मिळून करू आणि नागपूर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत उभा असल्याचे चित्र निर्माण करू, असे श्री पटेल म्हणाले. पक्षाच्या माध्यमातून नेहमीच तळागाळातील लोकांपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी कार्यरत असतो. अशा पक्षप्रवेशांमुळे पक्षाच्या कार्याला बळकटी मिळते.
हे पण वाचा, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यात खलबतं सुरु, राज्यात लवकरच राजकीय वादळ?
हे पण वाचा, गोपीचंद पडळकरांचा कर्जत-जामखेड मधील थेट वावर राम शिंदेची डोकेदुखी वाढवणारा
शहरातील प्रतिष्ठित श्री रविनिश पांडेय, श्री योगेश न्यायखोर, श्री मोहन गुरुपंच, श्री द्वारका साहू, श्री सोनू मिश्रा, श्री मनोज बडवाग, श्री कमलेश ठाकूर, श्री बावनकुळे,श्री प्रभुजी रोषनखेडे, श्री राजेश पांडे, श्री अमित पांडे, श्री नरेश निर्विवाद, श्री अमित वानखेडे, श्री जैनजी , श्रीमती संगीतादेवी मालाधारी, श्रीमती रेखा यादव, अनुपशिंग यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेशित सर्वांचे श्री पटेल यांनी पक्षाच्या वतीने स्वागत केले.
हे पण वाचा, अजित पवारांच्या अज्ञात वासाचे केंद ‘अंबालिका’त भेट झाल्याचे वृत्त माजी मंत्री राम शिंदे यांनी फेटाळले
हे पण वाचा, साई संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार निलेश लंके यांची नियुक्ती करण्यासाठी ‘या’ ग्रामपंचायतीने मांडला ठराव
गोंदिया इथे पीपी कॉलेज सभागृहात आयोजित @NCPspeaks कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केले. आपला पक्ष सदैव शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम आपण करत असल्याचे संबोधनात सांगितले. यावेळी अनेकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. pic.twitter.com/9KRNSTyapv
— Praful Patel (@praful_patel) June 20, 2021
हे पण वाचा, साई संस्थानाच्या अध्यक्षपदाबाबतीत सत्यजित तांबे व आशुतोष काळे यांच्या नावासाठी मुबंईत खलबतं
हे पण वाचा, नागपूर राष्ट्रवादीत असंतोष: दुनेश्वर पेठेंच्या नियुक्ती नंतर पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
यावेळी खासदार मा. श्री प्रफुल पटेल व माजी गृहमंत्री मा.श्री अनिल देशमुख सोबत पक्षाचे के वरिष्ठ नेता व पदाधिकारी श्री रमेश बंग, मा.श्री राजेंद्र जैन, श्री प्रकाश गजभिये, श्री दुनेश्वर पेठे, श्री प्रशांत पवार, श्रीमती आभा पांडे, श्री जानबाजी मस्के, श्रीमती सावरकर ताई, श्री शैलेंद्र तिवारी, श्रीमती वर्षाताई शामकुळे, मोठ्या संख्यने कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते.
- युती होऊ शकते, मात्र आता निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे- गिरीश बापट
- अजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी अंगलट; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक
- आमदार निलेश लंकेंच्या दक्षिण स्वारीमुळे दिग्ग्ज नेते हैराण; स्वकीय नेते देखील चिंतातुर अवस्थेत
- बिलोली- देगलूर पोटनिवडणुकीत भाजप पुन्हा एकदा पंढरपूर पॅटर्न राबविणार
- शरद पवार दिल्लीला रवाना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटणार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधान