मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ग्लेन मॅक्सवेलने जखमी असतांनाही जोरदार खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. ग्लेन मॅक्सवेलच्या पायाला दुखापत होत असतांनाही हातून सुटलेला सामाना अफगाणिस्तानकडून खेचून आणला. आता याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो ट्विट करत रोहित पवारांनी कौतूक केलं आहे.
हेही वाचा…“पेटवलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात यंदाची दिवाळी,” रोहित पवार अन् संदीप क्षीरसागर यांचा मोठा निर्णय
रोहित पवार यांनी शरद पवार यांचा पावसात भिजलेला फोटो आणि ग्लेन मॅक्सवेलचा फोटो ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, परिस्थिती कितीही विरोधात असली तरी मैदानात योद्धा जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं. असं रोहित पवारांनी म्हटलं.
हेही वाचा…जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत १६० जणांना अटक, दोन हजार जणांची चौकशी, पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक
तसेच नुसतं लढायचं लागत असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो, अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते. मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय. हेच काल ग्लेन मॅक्सवेलनं दाखवून दिलं. असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवार गटाला जोरदार टोला लगावला.
हेही वाचा…““मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व?” आदित्य ठाकरेंची सदा सरवणकरांवर बोचरी टिका
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने अफगाणिस्तानवर धक्कादायक विजय मिळवला. या सामान्यात २९२ धावांचा पाठलाग करतांना ऑस्ट्रेलिया संघाचे ९१ धावांवर ७ खेळाडू बाद झालेत. त्यानंतर अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळी करत १२८ चेंडूत नाबाद २०१ धावा चोपल्या.
परिस्थिती कितीही विरोधात असली.. मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं… नुसतं लढावंच लागत असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो… अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते…
मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय!… pic.twitter.com/lzkST86EWE
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगते की..,” पेडणेकरांची इडीच्या कार्यालयात जाण्यापुर्वी प्रतिक्रिया
हेही वाचा…“नव्या जुन्या महिला कार्यकर्त्यांना संधी, पुणे भाजप महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर”
हेही वाचा…ग्राऊंड रिपोर्ट : पिंपरीत ‘कमळ’ फुलवण्याची तयारी; महायुतीमध्ये मिठाचा खडा?
हेही वाचा…“तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकारणातून सन्यांस घेईन”, मुश्रीफांनी रोहित पवारांना दिलं थेट आव्हान
हेही वाचा…“मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही ,” गुणरत्ने सदावर्तेंनी सांगितलं खरं कारण