नागपुर : काॅंग्रेसमधील निलंबित काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज आशिष देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे काॅंग्रेसवर नाराज असलेले देशमुख पुन्हा भाजपमध्ये परतणार का ? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा मुहर्त ठरला…! तारीख ठरली, मंत्रीपदासाठी नावांची यादी तयार ?
काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आशिष देशमुख यांच्यात अलिकडेच वाद झाला. त्यानंतर आशिष देशमुख यांनी खासदार राहुल गांधी यांच्यावरही टिका केली. याचाच परिणाम म्हणून आशिष देशमुख यांना काॅंग्रेसमधून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर आशिष देशमुखांनी निवडणुक लढविणार असल्याचं बोलून दाखवलं. त्यातच आज भाजपच्या नेत्यांनी आशिष देशमुख यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा…“सुषमा अंधारे तुमचं म्हणजे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का ?” बीडच्या राड्यात शिंदे गटाची उडी
काॅंग्रेसने देशमुखांना अवघड जागा म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात पाठवले होते. कोणी दिमतीला नसतांना देशमुखांनी तगडी लढत देऊन फडणवीसांचे एका लाखांच्या मताधिक्यांनी निवडून येण्याचे मनसुबे उधळून लावले. देशमुख काॅंग्रेसमध्येही शांत बसले नाही. त्यांनी पटोलेंवर गंभीर आरोप केले होते. यात आता त्यांना भाजपमधून कटोल की सावनेर मतदार संघासाठी तिकीट देण्यात येणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कर्नाटक हल्ल्याचा इतका राग? ओ शेठ तुम्ही नादच केला थेट”, नोटबंदीवरून राष्ट्रवादीचा मोदींना टोला
हेही वाचा…“मोदी, शहांच्या शंभर पिढ्या आल्या तरी बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही”
हेही वाचा…“आर्यनचा आंतरात्मा .., प्लीज.. मी तुम्हाला बाप म्हणून.. “, आर्यन खानसाठी शाहरूख हातापाया पडला, वाचा सविस्तर…
हेही वाचा…“एवढ्या मोठ्या कलाकाराला मारहाण झाल्याचं ऐकून दु:ख झालं”,शिरसाठ यांनी सुषमा अंधारेंना डिवचलं
हेही वाचा…वानखेडेंना कोर्टाचा तात्पुरता दिलासा, तपासात आली मोठी ‘ही’ माहिती