बीड : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना दोन चापटा मारल्याचा दावा केला जात आहे. बीड जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहार केल्याचा दावा करत एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. त्यानंतर हा दावा सुषमा अंधारे यांनी फेटाळून लावला. तर आप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली आहे. त्यानंतर आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. सुषमा अंधारे यांनी २ लाख रूपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी अंधारे यांच्यावर खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी ठाकरेंबद्दल पुस्तकात काय लिहिलंय, ? फडणवीसांनी सांगितल्या त्या ‘१०’ गोष्टी”
एवढ्या मोठ्या अॅक्टरला मारहाण झाल्याचं ऐकून दु:ख झालं. त्या एक महान कलाकार आहेत. पैसै घेऊन काम करणाऱ्या नेत्या आहेत. आप्पासाहेब जाधव यांचा व्हिडीओ माझ्याकडेही आला असून तो व्हिडीओ मी पाहिला आहे. संबंधित व्हिडीओत त्यांनी आरोप केला की, या बाईन एसी, फर्निचरसाठी पैसे मागितले. एक गोष्ट लक्षात ठेवा. एखाद्या महिलेवर हात उचलण्यापर्यंत मजल जाते, याचा अर्थ आता मर्यादा संपली आहे. त्या बाई असं काहीतरी बोलल्या असतील. ज्यामुळे त्यांनी जे होईल त्या परिणामांना तोंड देईन, या मानसिकतेतून तो व्हिडीओ अपलोड केला. असं संजय शिरसाठ यांनी म्हटलं.
हेही वाचा…खळबळजनक..! भाजप नेत्याचा तरूणीवर लैंगिक छळ, आ’त्म’ह’त्ये’चा प्रयत्न, चंद्रकांत पाटील, निंबाळकर, श्रीकांत देशमुखांवर आरोप
पुढे बोलतांना संजय शिरसाठ म्हणाले की, सुषमा अंधारेंनी बाळासाहेब ठाकरेंना म्हातारड्या म्हटलं होतं. त्यांनी उद्धव ठाकरेची वाट लावली. आदित्यला बोकांडी घे आणि लुंडी डान्स कर असंही त्या म्हणाल्या होत्या. अशा व्यक्तीला उद्धव ठाकरेंनी मान्य केलं. त्यामुळे तुझ्या निष्ठचं काहीही मुल्य नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या निष्ठेला महत्व दिलं होतं. महिलेवर हात उगारू नये, या मताच मीही आहे. पण महिलेनं मर्यादा ओलांडू नये. मुख्य म्हणजे हा प्रकार जिल्हा प्रमुखांकडून घडला आहे, इतर कुणाकडून घडला असता तर आपण दुर्लक्ष केलं असतं. उद्धव ठाकरेंनी आता तरी डोळे उघडून या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे, नाहीतर संजय राऊत आणि सुषमा अंधारेंची जोडी त्यांना बुडवल्याशिवाय राहणार नाही. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…वानखेडेंना कोर्टाचा तात्पुरता दिलासा, तपासात आली मोठी ‘ही’ माहिती
हेही वाचा…शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा मुहर्त ठरला…! तारीख ठरली, मंत्रीपदासाठी नावांची यादी तयार ?
हेही वाचा…“सुषमा अंधारे तुमचं म्हणजे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का ?” बीडच्या राड्यात शिंदे गटाची उडी
हेही वाचा…“आघाडीत कोणताही फार्म्युला ठरला नाही, शिउबाठा लोकसभेच्या १९ जागांवर कायम,” आघाडीत शिजतंय काय?
हेही वाचा…“सुषमा अंधारेंनी कार्यकर्त्यांकडून २ लाख रूपये घेतलं”,आप्पासाहेब जाधवांचा आरोप, पक्षविरोधी कारवाईचा ठपका