मुंबई : आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अलिकडेच सीबीआयने समीर वानखेडे यांच्या घरावर छापा देखील टाकला. आज उच्च न्यायालयात या प्रकरणाबाबत सुनावणी पार पडली. या सुनावणीत समीर वानखेडे यांना शाहरूख खान यांच्यातील मोबाईल चॅट न्यायालयात सादर करण्यात आली. यातून मोठी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“सुषमा अंधारेंनी कार्यकर्त्यांकडून २ लाख रूपये घेतलं”,आप्पासाहेब जाधवांचा आरोप, पक्षविरोधी कारवाईचा ठपका
कोर्टात समीर वानखेडे यांच्या वकिलांनी सीबीआयचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी शाहरूख खान आणि समीर वानखेडे यांच्यातील मोबाईल चॅटचा संदर्भ कोर्टात दाखल केले. साहेब मला तुमच्याशी बोलायचंय. प्लीज मी बोलू शकतो का ? तुमचा सदैव ऋणी राहिल. त्याला तुरूंगात राहू देऊ नका मी विनंती करोत. तो तूरूंगात राहिला तर तो माणुस म्हणून मोडेल. त्यांचा आंतरात्मा वेगळा विचार करेन. प्लीज मी भीक मागतो. तुम्ही त्याला तिथे जास्त दिवस ठेऊ नका. त्याला लवकर घरी पाठवा नाहीतर तो पुर्ण उद्धवस्त होऊन जाईल. तुम्हालाही माहिती आहे, त्याच्यासोबत जरा जास्तच घडलंय. प्लीज मी तुम्हाला बाप म्हणून भीक मागत आहे. असंही त्यात उल्लेख करण्यात आला आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी ठाकरेंबद्दल पुस्तकात काय लिहिलंय, ? फडणवीसांनी सांगितल्या त्या ‘१०’ गोष्टी”
उच्च न्यायालयात या प्रकरणात सीबीआयने याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणीच्या वेळी समीर वानखेडे यांच्या वकिलांनी वानखेडे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच सीबीआयकडून वानखेडेंवर तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर न्यायालयाकडून वानखेडेंनी तपासात सहाकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढची सुनावणी ही २४ मे ला होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एवढ्या मोठ्या कलाकाराला मारहाण झाल्याचं ऐकून दु:ख झालं”,शिरसाठ यांनी सुषमा अंधारेंना डिवचलं
हेही वाचा…वानखेडेंना कोर्टाचा तात्पुरता दिलासा, तपासात आली मोठी ‘ही’ माहिती
हेही वाचा…शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा मुहर्त ठरला…! तारीख ठरली, मंत्रीपदासाठी नावांची यादी तयार ?
हेही वाचा…“सुषमा अंधारे तुमचं म्हणजे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का ?” बीडच्या राड्यात शिंदे गटाची उडी
हेही वाचा…“आघाडीत कोणताही फार्म्युला ठरला नाही, शिउबाठा लोकसभेच्या १९ जागांवर कायम,” आघाडीत शिजतंय काय?