मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणच्या सभेत अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांवर खोचक टिप्पणी केली. त्यांनी त्या सभेत सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तापसे यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला आहे. मराठवाड्यातील विकासासाठी काय व्हिजन आहे हे बोलण्याऐवजी आमचे बंड कसे योग्य होते आणि सत्ताबदलाचे नाटय कसे रंगले, हे बोलण्यातच मुख्यमंत्र्यांनी पैठणच्या सभेत वेळ घालवला, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.
तो 12 हजार कोटींचा ‘दंड पेंग्विन’ सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का ?” भाजपचा सवाल
शिंदे गटाने जे कृत्य केले त्याला घटनात्मक मान्यता मिळालेली नाही. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून घटनात्मक मान्यता मिळत नाही. तोपर्यंत शिंदे सरकार असंविधानिक आहे. त्यामुळे विरोधक हे टीका करतच राहणार, असेही महेश तपासे यांनी सुनावले. पैठण येथील सभेत राज्याला काय फायदा होणार किंवा मराठवाड्यातील विकासासाठी काय करणार हे सांगण्याऐवजी शिंदे यांनी अजित पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या टीकेचा धसका घेतल्याचेच स्पष्ट जाणवत होते असेही महेश तपासे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाडले, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शेकापला खिंडार!
मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी कशी जमवण्यात आली याचे चित्र महाराष्ट्रासमोर आल्याचेही महेश तपासे म्हणाले. दरम्यान, बंडखोरीचे कृत्य कसे योग्य होते आणि वस्तुस्थितीला धरून होते हे सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला, मात्र जनता दुधखुळी नाही. महाविकास आघाडी फोडण्याचे जे कृत्य केले आहे. त्यावरुन जनता तुमच्या ५० पैकी ४५ आमदारांचा नक्की पराभव करणार, असा इशाराही त्यांनी दिला.
Read also
- “पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंचा राजीनामा घेऊन मोकळे सोडले पाहीजे”
- “उद्धव ठाकरेंनी हा अस्वल कुठून निवडला होता माहित नाही?”; भास्कर जाधवांची बांगरांवर टिका
- “दादा वॉशरूमला गेले होते रे, आता पुढच्या नाराजी पर्यंत तरी चर्चा बंद करा”
- “हिमंत असेल तर मोदी साहेबांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा”; अजित पवार
- सोमय्यांचा घाव अनिल परबांवर बसला..! रिसोर्ट तुटणार, परब अडकणार..?