IMPIMP
Jayant Patal's big statement is that Sharad Pawar will visit Ram Lalla at some point, even if there is no invitation Jayant Patal's big statement is that Sharad Pawar will visit Ram Lalla at some point, even if there is no invitation

“निमंत्रण आलं नाही तरी, कधीतरी शरद पवार राम लल्लांच्या दर्शनाला जाणार”, जयंत पाटलांचं मोठं विधान

पुणे : सत्तारूढ पक्षाला मदत होईल असे कृत्य कोणत्याही पक्षाकडून होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे; महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावाचा विचार केला जाईल. अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच  महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करण्याचे काम आमच्या पक्षाकडून सुरू आहे; येत्या तीन आणि चार जानेवारी रोजी  पवार साहेब या संदर्भात कार्यकर्त्यांपुढे आपले विचार मांडतील. असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

हेही वाचा…सुप्रिया सुळेंनी बारामतीत ठोकला तळ ; दहा महिने बारामतीतच राहणार, निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात 

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी शरद पवारांना आमंत्रण आलं नाही. यावर बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, राम मंदिर न्यास कडून निमंत्रण आले नसले तरी, नंतर कधीतरी राम लल्लांच्या दर्शनाला जाणार असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. राम जन्माच्या वेळी अयोध्या नगरी सजवण्यात आली होती, त्यांची प्राण प्रतिष्ठा होत असताना सर्वांनी सकारात्मक राहण्यात काही अडचण नाही; सर्वांनी हा कार्यक्रम आनंदाने घ्यावा त्यात आडकाठी आणण्याचे कारण नाही. असंही त्यांनी सांगितले.

हेही वाचा…“जयंत पाटील राष्ट्रवादीत किती दिवस राहणार, याची शाश्वती नाही” 

नितीन गडकरी यांनी शरद पवारांचं कौतूक केलं आहे. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, आदरणीय पवार साहेबांचे महत्व जनतेच्या मनात खोलवर रुजले आहे, पक्षापलीकडे जाऊन जे चांगले आहे त्याचे कौतुक साहेब नेहमीच करत असतात. नितीन गडकरी यांच्यासारखा मोकळेपणा इतर कुठल्याही नेत्यात दिसत नाही. भारतीय जनता पार्टी व आपल्या पक्षाच्या मान्यतेने मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांची पालकमंत्री पदी नियुक्ती केलेली आहे, अजित पवार त्यांच्या लोकप्रतिनिधींना मदत करतीलच त्याचा त्रास या दोन्ही पक्षांना सहन करावाच लागेल. असाही टोला जयंत पाटलांनी महायुतीला लगावला.

READ ALSO :

हेही वाचा…पुणे लोकसभा लढण्यास वसंत मोरेंनंतर साईनाथ बाबर देखील इच्छूक ; राज ठाकरे कुणाच्या नावाला पसंती देणार? 

हेही वाचा…पुणे लोकसभा लढण्यास वसंत मोरेंनंतर साईनाथ बाबर देखील इच्छूक ; राज ठाकरे कुणाच्या नावाला पसंती देणार? 

हेही वाचा.एकनाथ शिंदे अन् राज ठाकरेंच्या भेटीवर आव्हाडांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले, मार्चमध्ये हनिमुनला जातील अन् त्यानंतर… 

हेही वाचा..“खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, चप्पल घालायला पैसे राहणार नाहीत,”महाजनांचं जोरदार प्रत्युत्तर, खडसे-महाजन वाद पेटला 

हेही वाचा…“मिटकरी.. “आमदार” लिहिताना लाज वाटेल असं वागू नका,” सुळे आणि कोल्हेंवर केलेली टिका मिटकरींना भोवली