मुंबई : राष्ट्रात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे आशा आशायाची जाहिरात आज शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून लावण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न शिंदेंकडून करण्यात आला आहे. यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपला डिवचण्यात आलं आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला छ.संभाजीनगरचे वावडे..! औरंगाबादचं नामांतराचा पडला विसर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व्हेमध्ये सर्वाधिक पसंती असल्याचे आढळून आल्याने भाजपने त्यांना पुर्ण नेतृत्व द्यावे, आणि ते म्हणतील तेवढ्या जागा त्यांच्या पक्षाला द्याव्यात अशी आमच्या पक्षाची उपसूचना असल्याचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. ते सांगलीत माध्यमांशी बोलतांना म्हणाले. त्यांच्या पक्षाने ७०, ८०, ९०, जागा मागितल्या असतील तर भाजने देऊन टाकाव्यात असा शाब्दिक टोलाही त्यांनी हाणला.
हेही वाचा…मोदींना जिंकवण्यासाठी भाजप ‘ह्या’ खासदारांचे तिकीट कापणार, बड्या नेत्याचं वक्तव्य
दरम्यान, शिवसेनेकडून आज बहुतांश वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात देण्यात आली असून याध्यमातून सरकारच्या कामगिरीवर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट तुलना कधीही करण्यात आली नव्हती, मात्र जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के लोकांची पसंती असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी महेश लांडगे लागले कामाला..! ओझरमध्ये “श्री गणेशा”, सोबतीला भाजपची फौज
हेही वाचा…“महाराष्ट्रातच नाही तर या राज्यांतही मित्रपक्षांचं भाजपसोबत बिनसलं” मोदींना मोठा धक्का बसण्याची शक्यता
हेही वाचा…“कमी मार्काने पास झालो हे जाहिरातबाजीतून सांगणारा शिंदेंचा पहिलाच पक्ष”,सुप्रिया सुळेंनी उडवली शिंदेंची खिल्ली
हेही वाचा…“शिवसेना आमचीच दावा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा फोटो वगळला, हा त्यांचा अपमान नाही का ?” अजित पवारांचा सवाल
हेही वाचा…राज्यात आज निवडणुका झाल्यास काय होणार ? सर्वात मोठा एक्झिट पोल आला पुढे, शिंदेंचं काय होणार?