बीड : राज्यातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सातत्याने चर्चेत राहिले आहे. यातच बीड जिल्हातील गेवराई तालुक्यात अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी चहा घेतांना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अजबच सवाल केला. त्यावरून त्यांच्यावर आता प्रखर शब्दात विरोधी पक्षातील नेत्यांकडून टिका केली जात आहे.
“तुझ्या वडिलांना देखील धुळ चारली आहे, तुला पण..”; आमदार वैभव नाईक भडकले
नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करतावेळी त्याठिकाणी नेतेमंडळी, अधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत अब्दुल सत्तार यांनी चहा घेतला. त्यावेळी त्याठिकाणी जिल्हाधिकारी देखील उपस्थित होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चहा घेण्यास नकार दिल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का? असा अजबच सवाल केला. त्यानंतर हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला. अन् थोड्यावेळातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यावर आता सगळ्या स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
यावर काॅंग्रेसेच नेते सचिन सावंत यांनी देखील हा व्हिडीओ पोस्ट करत सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. यामध्ये त्यांनी अतिवृष्टी पाहणी दौरा की मद्यसृष्टी दौरा? असा खोचक सवाल देखील केला आहे. तसेच गम का दौर हो या हो खुशी, समा बॉॅंधती है शराब, किसान मरे या करे खुदकुशी, समा बॉॅंधती है शराब, एक मशवरा है जनाब के थोडी-थोडी पिया करो, हुई महॅंगी बहुत ही शराब, के थोडी -थोडी पिया करो. असं म्हणत त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टिका केली आहे.
“चिपळूनमध्ये येऊन भास्कर जाधवांना ठोकून काढू”; प्रवीण दरेकरांचा इशारा
दरम्यान, मागील काही दिवसापुर्वी झालेल्या परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सगळ्या स्तरातून केली जात आहे. मात्र अद्यापही यावर राज्य सरकारने निर्णय घेतला नाही. यानंतर राज्यातील विरोधी पक्षांतील नेत्यांसह कृषी मंत्र्यांनीही नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर हा प्रकार घडला आहे.
अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा?
गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब
किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब
एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो
हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो 🤔 pic.twitter.com/UDZsfypmAO— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 27, 2022
Read also
- “खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही”; आदित्य ठाकरेंचा गहरा घाव
- “महाराष्ट्राची वाट लावण्याचे नियोजित काम सुरूय”; रूपाली पाटलांचा शिंदेंवर हल्लाबोल
- “देवेंद्र फडणवीस सरकारच्या घोषणांच्या गाजराचे उदंड पीक”; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- बळीराजाला मदत करणाऱ्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात..! उद्या मराठवाड्याचा दौरा
- “भाजप अन् मनसेचं नातं लिव्हइन रिलेशिनशिप जोडप्यासारखं”