मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली होती. यावेळी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा असे आदेश त्यांनी माजी नगरसेवकांना दिले आहेत. मुंबई महापालिका निवडणुक शिवसेना जिंकणारचं असा आत्मविश्वास व्यक्त केला. लोकांसोबत काम करणे हा शिवसैनिकांचा गुणधर्म आहे, ही कामे करत राहा, वॉर्डामध्ये फिरा असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला आहे. जे गेले त्यांची आपल्याला पर्वा नाही, शिवसैनिक आपल्यासोबत आहेत. सामाजिक बांधिलकी सोडू नका, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
“75 वर्षात पहिल्यांदाच आपल्या देशाला स्वच्छ विचारांचे पंतप्रधान लाभले”; नवनीत राणा
शिवसेनेने तुम्हाला दिलेली वाट आहे. त्या वाटेवर सामाजिक बांधिलकी घेऊन लोकांच्या समोर जा आणि कामे करा. मागचा नगरसेवक जे काम करतो त्या नगरसेवकाच्या कामावर आमदार आणि खासदारांची निवडणुक होते आणि आमदार आणि खासदारांच्या कामाचं कौतुक ही नगरसेवकाला मिऴते. त्यामुळे जे आमदार गेलेले आहेत ते काय काम करतात हे सर्वांना माहीत आहे. पण जे आहेत ते काम करत आहेत. आजही नागरीक आमच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांची कामे आम्ही केली पाहिजेत. अनेकांचे फोन येतात, काही लोकांच्या आता भेटीगाठी वाढल्या आहेत. मी कोणालाही जबरदस्ती करत नाही की तुम्ही इकडे किंवा तिकडे पाहिजे, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
“इगो उद्धव ठाकरेंना नाहीतर देवेंद्र फडणवीसांना आहे”
शिंदे गटातील आमदार दादरमध्ये सेनाभवन उभारणार करणार आहेत असा प्रश्न विचारले असता पेडणेकर म्हणाल्या की, यावर असे दलबदलु काँग्रेसमध्ये जातील, इकडे जातील त्याला काय प्रतिक्रिया द्यायची. त्यांना कामातुन प्रतिक्रिया देऊ असं म्हणाल्या. या बैठकीला 13 माजी नगरसेवक अनुपस्थित होते. मात्र या बैठकीचे निरोप काल दुपारनंतर गेले होते, जे आज अनुपस्थित होते त्या सगळ्यांनी त्यांची कारणे पक्षाला कळवली होती, असंही त्या म्हणाल्या.
2017 मध्ये मुंबई पालिका निवडणुकीला प्रभागरचना होती तीच ठेवली तेच बरं झालं. यावरून शिवसेना कोर्टात जाणार का हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील. आम्ही जे काम केलं आहे त्या कामवर आमचा आम्हाला भरोसा आहे. नागरिकांवरही आमचा पुर्ण विश्वास आहे. नागरीक आजही आमच्या सोबत आहेत. ते आमच्याशी सुख दु:ख शेअर करत आहेत. आकडे वाढलेत आकडे लावण्याचं कांम कोण करत आहे हे तुम्हा पाहताय असं म्हणत पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Read also
- “बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायाचे आहे, अन् हे अजूनही खातेवाटपावर अडले आहेत”
- बावनकुळेंकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद तर मुंबईचे अध्यक्ष म्हणून शेलारांची निवड
- “..म्हणुन मी उद्धव ठाकरेंवर बोलणे टाळतो”; दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
- “चला आता काँग्रेसला सुध्दा उध्दव ठाकरेंचे मूळ गुण कळू लागले”; मनसेचा खोचक टोला
- “एक एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू ;” अन् त्यावर पंकजा मुंडेंचा खुलासा