कराड: सांगली आणि सातारा जिल्हाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आली आहे. सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गट,डॉ. इंद्रजित मोहिते गट आणि अविनाश मोहिते गट यांच्यात कृष्णा कारखान्यासाठी मुख्य लढत होणार आहे.दोन्ही मोहितेंआणि सत्ताधारी भोसले या तीनही पॅनलकडून प्रचार जोरदार सुरु आहे . दोन्ही मोहितेंचे मनोमिलन होत नसल्याने आता कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत होणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी भोसले विरुद्ध मोहिते गटात रंगणार कलगीतुरा
कारखाना निवडणुकीसाठी २९ जून रोजी मतदान होणार आहे तर १७ जून ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. सध्या रयत क्रांती पॅनल, संस्थापक पॅनल आणि जयवंतराव भोसले सहकार पॅनल या तीन पॅनलच्या माध्यमातून अनेकजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. काही ठिकाणी जास्तीचे इच्छुक उमेदवार असल्याने पॅनलप्रमुखांची अर्ज माघारीच्या दिवशी चांगलीच डोकेदुखी होणार आहे. कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीदरम्यान आता कराड सह वाळवा तालुक्यात देखील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्यासाठी बोरगावमध्ये होणार संस्थापक पॅनल आणि सहकार पॅनल मध्ये काटे की टक्कर
हे पण वाचा, डॉ. सुरेश भोसले आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात कृष्णा साठी ‘खलबतं’; निवडणुकीचा सस्पेन्स वाढला
कराड तालुका आणि वाळवा तालुका या दोन्ही तालुक्यांमध्ये कृष्णेचे मोठया प्रमाणावर सभासद आहेत. कारखाना निवडणुकीत कराड प्रमाणेच ज्यांचा वाळव्या तालुक्यावर वचक राहणार तोच कारखान्याचा चेअरमन होणार हे निश्चित आहे. पॅनल दोन असले किंवा तीन असले तरी या तालुक्यातील दिग्ग्जजांचा मात्र प्रत्येक पॅनल मध्ये सहभाग आहे. कोण्या एकट्याने आमच्याकडेच उमेदवार आहेत व पक्ष नेत्यांचा पाठींबा आहे हे राजकीय गणित या दोन तालुक्यांबाबत न लावलेलेच बरे. त्यातच निवडून आल्यानंतर सभासद वाढीवर सगळ्या सत्ताधिकाऱ्यांनी भर दिल्याने सभासद देखील मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याने आता निवडणूक पहिल्या पेक्षा थोडी अवघड नक्कीच झालेली आहे. वाळवा आणि कराड यांच्याच पाठींब्यावर सत्ता पालट होणार अथवा आहे ती सत्ता राहणार. त्यामुळेच आता या दोन्ही तालुक्यांतून काय घडामोडी होतात यावर सर्वच पॅनलप्रमुख बारीक लक्ष ठेऊन आहेत.
हे पण वाचा,
कृष्णाकाठी अविनाश मोहितेंना बसणार मोठा धक्का; समर्थक सुरेश भोसलेंच्या पॅनलकडून लढण्याच्या मनस्थितीत
महिला राखीव गट: ‘त्या’ नऊ इच्छुक महिला उमेदवारांमुळे पॅनलप्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ
“विरोधकांकडे निवडणुकीसाठी कोणताच मुद्दा नसल्याने विरोधक गोंधळात” अतुल भोसले
पॅनेल प्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ: भोसले गट आणि जयंत पाटील गट यांची जवळीक आणखी वाढते की काय?