पुणे : पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात कायम केंद्रस्थान असणारे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या काही दिवसापासून आजारी आहेत. त्यांच्यावर बाणेर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे त्यांना सध्या राज्यातील अनेक नेत्यांची रूग्णालयात भेटण्यासाठी रिघ लागली आहे. त्यात भाजपमधील अनेक बड्या नेत्यांपासून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील रूग्णालयात हजेरी लावली आहे.
पेंग्विन, म्याऊ म्याऊ, कोंबडा, अन् आता म्हैस, नागाचा फणा; राज्यातील राजकारण कुठं चाललंय ?
लक्ष्मण जगताप यांचे राजकीय मतभेद असणारे नवनाथ जगताप हे तर यांनी तर गेल्या 2 दिवसांपासून दवाखान्यात ठाण मांडून आहेत. लक्ष्मण जगताप यांच्या तब्बेतीत सुधारणा होत आहे. याबाबत अनेक नेत्यांनी पोस्ट करून कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. लक्ष्मण जगताप हे पिंपरी चिंडवड विधानसभा मतदारसंघाचे सलग चार टर्म आमदार आहेत. मागील 35 वर्षापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. विधान परिषदमध्ये एक वेळा तर विधानसभेत त्यांनी 3 वेळा आमदार म्हणून काम केलं आहे. 2004 सालीच्या निवडणुकीत ते विधान परिषदमध्ये निवडून आले होते. तर 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा त्यांनी अपक्ष म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता.
राष्ट्रवादीचं मनसेला जशाच तसं उत्तर; मंदिरात एकीकडे महाआरती तर दुसरीकडे इफ्तार पार्टीचं आयोजन
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष्मण जगताप हे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यांनी 2014 साली भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 2014 साली आणि त्यानंतर 2019 साली देखील त्यांनी कमळाच्या चिन्हावर निवडून आले. मावळ लोकसभा मतदारसंघातून ते शेकापच्या तिकीटावर लढले. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याकडून पराभव झाला.
राऊतांचा सोमय्यांवर 100 कोटीचा नवा टॉयलेट घोटाळा; लवकरच उघड करणार: संजय राऊत
दरम्यान, महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता येण्यामागे जगताप यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी अनेक समाजसेवी संस्थांची स्थापना केली आहे. लक्ष्मण जगताप यांच्या स्पष्टवक्ते स्वभावामुळे त्यांना हेडमास्तर देखील म्हटलं जात. दरम्यान त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक नेत्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केलं आहे.
Read also:
- “ते 100 टक्के खरं आहे”; मुंबई बॉम्ब स्फोटांबाबत शरद पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
- तुम्ही फक्त मातोश्रीवर येऊन तर दाखवा; किशोरी पेडणकरांचं रवी राणांना खुलं आव्हान
- “मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसेचं पठण व्हायलाच पाहिजे”; रवी राणा यांची मागणी
- मनसेच्या हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाला वसंत मोरे जाणार नाहीत? राज ठाकरे उपस्थित राहणार
- सोमय्यांचा निशाणा आता मुख्यमंत्र्याच्या मेव्हाण्यावर! 29 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप