सातारा: राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यात अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहे. सातारा जिल्ह्यातील मोरगिरी, आंबेघर, हुंबरळी तालुक्यात महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
हे पण वाचा: पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
सातारा जिल्ह्यात महापुराचा वेढा पडला असून बाजारपेठ, एसटी स्टँडसह शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं असुन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. संध्या पुराचे पाणी ओसरले असून आता सर्वत्र चिखल झाला आहे. अनेक भागात दरड कोसळली असुन अनेक जण दगावले आहे.
हे पण वाचा: कोल्हापुरात अत्यावश्यक सेवा सोडून इतर वाहनांना इंधन न देण्याचा निर्णय
विरोधी पक्षनेते पुरग्रस्त नुकसानीचा व तेथील परिस्थीतीचा आढावा घेण्याकरीता सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याची सुरूवात मोरगिरी, आंबेघर तालुक्यातील पाटण गावापासुन होणार आहे. पाटण गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी दुपारी २.४५ वाजता करणार आहेत.
हे पण वाचा: आठवडा उलटून गेला…पूरग्रस्तांसाठी पॅकेज कधी? अजित पवारांनी केले भाष्य
मोरगिरी, आंबेघर तालुक्यातुन कोयनानगर येथील प्रथमिक केंद्र शाळा येथे स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांची संध्याकाळी ४.३० वाजता भेट घेणार आहेत. त्याचबरोबर हुंबरळी तालुक्यातील पाटण गावामधील अतिवृष्टीग्रस्त भागाची संध्याकाळी ५.१५ वाजता पाहणी करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
हे पण वाचा: “…तर बॉलिवूडच्या ‘क्वीन’ला होऊ शकते अटक”, न्यायालायने दिली होती अखेरची संधी
खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २६ जुलै रोजी सातारा येथे जाऊन तेथील पूरस्थितीची पाहणी करणार होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर पुन्हा पुण्यात परतलं होतं. सातारा दौऱ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टरने पुण्याहून उड्डाण केलं होतं. मात्र अत्यंत खराब वातावरण असल्याने एअरफोर्सचं हेलिकॉप्टर पुन्हा पुणे विमानतळावर आणण्यात आलं होतं. त्यानंतर काही वेळाने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं होतं की, मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द करण्यात आला आहे.
Read Also :
- राज्यपाल कोश्यारींकडून ठाकरे सरकारचे कौतुक, महापुराच्या संकटात उत्तम कामगिरी
- ‘आम्हीही व्यवस्थेचा भाग, लोकशाहीची थट्टा करु नका’, राऊतांच्या टिकेला प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर
- कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज, ६ जिल्ह्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
- कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; २ जण गंभीर जखमी
- “पंडित नेहरुंबद्दल प्रचंड आदर, पण…”, राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याने खळबळ