पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या पुण्यातील गणेश कला क्रिडा मंडळ येथे सभा होणार आहे. त्या सभेसाठी काल राज ठाकरे हे पुण्यात दाखल झालेत. अलिकडील सभांमुळे मनसे सध्या चर्चेत आली आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांच्यावर राजकीय पक्षांनी जोरदार चिखलफेक केली. अशातच आता पुण्यातील सभेचा ट्रेलर मनसे नेते गजानन काळे यांनी पोस्ट केला आहे.
“पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना?” नवाब मलिक प्रकरणांवरून निलेश राणेंचा तिखट सवाल
गजानन काळे यांनी टोमणे सभेचा समाचार आता पुण्यात.. उद्या सकाळी 10 वाजता राजगर्जना असं कॅप्शन देत त्यांनी राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये मुंबई, ठाणे, आणि औरंगाबाद येथील झालेल्या सभांमधील क्लिपमधील काही फुटेज दाखविले आहेत. तसेच त्यात करारा जवाब मिलेगा, असंही म्हटलं आहे. धार्मिक वळण देणार असाल तर आम्ही देखील धर्मानेच उत्तर देऊ, असंही त्यात म्हटलं आहे.
नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; दाऊदच्या लोकांसोबत व्यवहार केल्याचा न्यायालयाचं निरीक्षण
संपुर्ण देशातील लाऊड स्पीकर खाली आले पाहिजे. सगळ्यांना धर्म समान असायला हवा. यांना सरळ मार्गाने होत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊद्या. त्यामुळे माझी पोलिसांना एक विनंती आहे की, या लोकांची अगोदर थोबाडं बंद करा. यांना जर सरळ मार्गाने सांगून समजत नसेल तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनगटात काय ताकद आहे ती दाखवूनीच द्या. असंही ते म्हणाले. तसेच वारसा चालविणे म्हणजे काही गुन्हा आहे का? तसेच याबाबत पसंती, नापसंती, असा इतरांचा प्रश्न येतो का? बाळासाहेब ठाकरे असं नमुद कऱण्यात आलं आहे.
जितेंद्र आव्हांडाचं एक ट्विट; अन् चार जणांवर कारवाईचा बडगा
दरम्यान, राज ठाकरे यांची पुण्यातील सभा सुरूवातीला नदीपात्रात घेण्याचं ठऱलं होतं. मात्र अचानकपणे निर्णय बदलण्यात आला आणि आता उद्या गणेश क्रिडा कला मंडळात होणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
टोमणे सभेचा समाचार आता पुण्यात …
उद्या सकाळी १० वाजता राजगर्जना … pic.twitter.com/9VKIEbg1nf
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 21, 2022
Read also:
- “छत्रपती संभाजीराजेंसमोर अटी, शर्टी ठेवणं योग्य नाही”; प्रवीण दरेकरांनी शिवसेनेला सुनावलं
- “मुंडे साहेबाचं स्वप्न महाविकास आघाडी सरकारमध्ये पुर्ण करता आलं”; धनंजय मुंडे
- “हा जमलेला महासागर सांगतो की शेतकऱ्यांना या मुर्दाड सरकारविरोधात चीड”
- नवाब मलिक प्रकरणांवरून फडणीस संतापले; म्हणाले.. की, जेवढा अट्टाहास मलिकांना वाचवण्यासाठी…;
- अजून किती काळ नवाब मलिकांची पाठराखण करणार? राजीनामा घ्या; चंद्रकांत पाटील