मुंबई : शिवसेनेच्या आक्रमक विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनिषा कायंदे यांच्यासह काल माजी नगरसेवकांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धोका मानला जात आहे. यावरून आता मनसेच्या नेत्यानी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“उद्धव साहेब, तुम्ही फक्त संजय राऊतांना बाजूला करा, तीच शिवसेना उभी करू”
ठाकरे गटात महिला आघाडीची बरीच घुसमट गेल्या वर्षाभर होत होती. त्याठिकाणी मागून आलेल्यांना मोठी संधी दिली जात होती. पंरतु जुन्या नेत्यांना सातत्याने डावलण्यात आलं. असं म्हणत मनिषा कायंदे यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. त्यावर फर्निचरवालीबाईमुळे पहिली विकेट गेली, दादा हो, काका हो. ऐकताय ना.. नाणं वाजवून घ्या. असं म्हणत मनसेचे नेते गजानन काळे यांनी अंधारेंना टोला लगावला.
हेही वाचा…ठाकरेंना धक्का देत विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर NCP अन् काॅंग्रेसमध्ये चुरस, तातडीची बैठक बोलवली
दरम्यान, ठाकरे गटात अनेक काम करण्यासाठी जबाबदारी मागत होते. मी कधी मंत्री पद मागितलं नाही किंवा अजून काही मागितलं नाही. यापुढे कधी मागणार नाही. परंतु काम करायचंय परंतु वेळ वाया जात होता. नुसतं सकाळी उठून आपण एकमेकांवर टिका टिप्पणी करायची. त्या पेक्षा सकारात्मक काम करावं ही माझी भावना होती. एकनाथ शिंदे हे काम करणारे मुख्यमंत्री आहेत. हे झपाट्याने काम करतात ते पुर्वी त्यांचा जो स्वभाव आहे तोच आताही आहे. असंही कायंदे म्हणाले.
” फर्निचर वाली बाई ” मुळे पहिली विकेट गेली …
दादा हो,काका हो… ऐकताय ना …
नाणं वाजवून घ्या …— Gajanan Kale (@MeGajananKale) June 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मुंडे भाऊ-बहिणीचे राजकारणात पुन्हा सुर जुळले, पंकजा मुंडे अध्यक्षपदी, तर धनंजय मुंडे….
हेही वाचा…“९९ टक्के लोक मलाही मुख्यमंत्री करू इच्छीतात”, त्या सर्व्हेवर आव्हाडांची प्रतिक्रिया
हेही वाचा…२० जून जागतिक “गद्दार दिन” साजरा करा, ठाकरे गटाची थेट युनोकडे पत्राद्वारे मागणी
हेही वाचा…अंबादास दानवेंचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद जाणार, ठाकरेंना आता राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस धक्का देणार ?
हेही वाचा…राज्यात आता निवडणुका झाल्या तर कोण मुख्यमंत्री, कुणाची सत्ता ? एका सर्व्हेमध्ये धक्कादायक माहिती समोर