नाशिक : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी नाशिक महापालिका निवडणुकीत वेळप्रसंगी स्वबळावर लढण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे – राजेश टोपे
आगामी महापालिका निवडणुकीच्या जागावाटपात सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, तर स्वबळाची तयारी ठेवा, अशा सूचना राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रवादीचे नेते तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. संघटनेतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना हटविण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.
पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: जाऊन संप मिटवा, गोपीचंद पडळकरांचा अनिल परब यांना सल्ला
महापालिका निवडणुकादेखील वेळेत होण्याची चिन्हे असल्याने पालकमंत्री भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. पक्षीय कामकाजाचा आढावा घेत ते म्हणाले, की महापालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ सध्या जरी कमी असले, तरी यंदाच्या वेळेस मात्र आपल्याला ती भरपाई करावी लागणार आहे. त्यामुळे आपसांतील मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. राज्यात महाविकास आघाडी सरकारला संपूर्ण राज्यातील जनतेची पसंती असून, वरिष्ठ पातळीवर आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
Read also:
- मुंबई महानगरपालिका म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कमाईचे साधन – किरीट सोमय्या
- …कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहेत – पंकजा मुंडे
- “पवारांना बैठका घ्यायचाच असतील, तर मुख्यमंत्री त्यांनाच चार्ज का देत नाहीत?”
- पुण्यात भाजपला धक्का, 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला?
- पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला; भुजबळांचा पडळकरांना खडा सवाल