पुणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील राजकीय गणित बदलली आहेत. यातच आगामी काही काळात राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. यातच बारामतीवरून भाजपचे नेते राष्ट्रवादी सातत्याने डिवचत आहेत. त्याला आता प्रत्युत्तर देण्यात आला आहे.
हेही वाचा…“सुषमा अंधारेंनी कार्यकर्त्यांकडून २ लाख रूपये घेतलं”,आप्पासाहेब जाधवांचा आरोप, पक्षविरोधी कारवाईचा ठपका
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मिशन बारामती ठेवलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपने मोठी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. तर बारामती विधानसभा मतदार संघावरही भाजप डोळा ठेऊन आहे. यावरून भाजप सातत्याने बारामतीचा घड्याळ बंद करण्याच्या वल्गना करीत आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अजित पवारांच्या विरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी ठाकरेंबद्दल पुस्तकात काय लिहिलंय, ? फडणवीसांनी सांगितल्या त्या ‘१०’ गोष्टी”
“बावनकुळे एवढे मोठे नेते असते तर मागील निवडणुकीत त्यांचं तिकीट कमी का झालं असतं. त्यांची निवडून येण्याची खात्री नव्हती म्हणून त्यांना नाकारण्यात आलं होतं. आता ज्याला स्वत: च्या निवडून येण्याची खात्री नाही, जो व्यक्ती मागच्या दाराने विधान परिषदेत आला त्याने बारामतीविषयी काय बोलावं. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी ते तसं बोलत असतील. असं मोहिते पाटील म्हणाले.
हेही वाचा…खळबळजनक..! भाजप नेत्याचा तरूणीवर लैंगिक छळ, आ’त्म’ह’त्ये’चा प्रयत्न, चंद्रकांत पाटील, निंबाळकर, श्रीकांत देशमुखांवर आरोप
अजित पवारांकडे ज्यावेळी उर्जा खातं होतं. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे ठेकेदारीचं काम करत होते हे आम्ही पाहिलंं आहे. ते तेव्हा दिवस दिवस अजित पवारांच्या ऑफिसमध्ये बसलेले असयाचे. आता पद आल्यावर ते बारामतीविषयी बोलत असतील. तर त्यांनी एकदा अनुभव घ्यायला हरकत नाही. अनेकांनी बारामतीत जाऊन अनुभव घेतले आहेत. बावनकुळेंनीही बारामतीचा अनुभव घ्यावा. माझी विनंती आहे की, बावनकुळेंनीच बारामतीतून उभे राहावे. म्हणजे त्यांना कळेल. त्यांनी इतरांचा बळी देऊ नये. बावनकुळे सरकार आहेत. तर त्यांनीच बारामतीत येऊन अजित पवारांविरोधात लढावे. त्यानंतर त्यांना अजित पवारांची ताकद कळेल. असंही मोहिते पाटलांनी आवाहन दिलं.
READ ALSO :
हेही वाचा…“मी पण अनेक वर्ष पालकमंत्री होतो, पण असा कधीच भेदभाव केला नाही”, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा
हेही वाचा…सुषमा अंधारेंना मारहाण करण्याचा दावा करणाऱ्या आप्पासाहेब जाधवांची हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका
हेही वाचा…शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा मुहर्त ठरला…! तारीख ठरली, मंत्रीपदासाठी नावांची यादी तयार ?
हेही वाचा…“सुषमा अंधारे तुमचं म्हणजे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का ?” बीडच्या राड्यात शिंदे गटाची उडी
हेही वाचा…“आघाडीत कोणताही फार्म्युला ठरला नाही, शिउबाठा लोकसभेच्या १९ जागांवर कायम,” आघाडीत शिजतंय काय?