मुंबई : देवेंद्र फडणवीस यांची काल गोरेगाव येथील हिंदी भाषिक सभा पार पडली. भाषणाची सुरूवात त्यांनी हनुमान चालिसा करून केली. त्यावरून आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. तसेच या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करताना जोरदार टोलेबाजी देखील केली आहे. त्यामुळे त्यावर आता नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
दुसऱ्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल बोलता, मग कोणी म्याव म्याव आवाज काढला, तर वाईट का वाटलं?
देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजाचा कर्कश भोंगा ऐकला. त्या भोंग्यातुन हनुमान चालीसा मधील चौपाई चा आधार घेत “पैसा” असा उल्लेख आला . रात्रंदिवस पैसा पैसा करणाऱ्या भाजपाच्या ह्या भरीव नेत्यांनी खरा अर्थ अगोदर समजून घ्यावा “रामदुआरे तुम रखवारे ! होत न आज्ञा बिनु पईसारे, असं म्हणत त्यांनी हनुमान चालिसा मधील चौपाईचा अर्थ देखील देवेंद्र फडणवीस यांना सांगितला आहे. त्याबाबत त्यांनी एक ट्विट केलं आहे.
केतकी चितळेला शिवीगाळ, चोपायची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करणार का? चित्रा वाघ यांचा सवाल
अमोल मिटकरी यांनी हनुमानचा फोटो असलेला आणि त्याखाली त्या चौपाईचा अर्थ असलेला फोटो ट्विट केला आहे. त्यात असं लिहिलं आहे की, जय हो हनुमान बाबा की, इन लाइन को पूरा जान लीजिए तभी अर्थ समझ में आएगा. “राम द्वारे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे”. अर्थ श्री रामचन्द्र जी के द्वार के आप रखवाले है, जिसमें आपकी आज्ञा बिना किसी को प्रवेश नहीं मिलता अर्थात् आपकी प्रसन्नता के बिना राम कृपा दुर्लभ है, असं म्हटलं आहे.
मग औरंगजेबच्या कबरीपर्यंत पोहचता यावं यासाठी का बुलेट ट्रेन? भाजप- शिवसेनेत ‘बुलेट ट्रेन वार’
दरम्यान, राज्य चालवणं तुम्हाला आयपीएलसारखे वाटतं. त्याने तुमचे मनोरंजन होते. पण, त्या नांदेडमधील आत्महत्या केलेल्या शेतकर्यांचे काय? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या सभेत उपस्थित केला असून तुमचे कालचे भाषण पूर्णत: सोनियांना समर्पित आहे अशीही टिका केली. तसेच आता संभाजीनगरचा विषय विसरा. कारण मुख्यमंत्री कालच म्हणाले, आता आम्ही म्हणतो तर नाव बदलण्याची गरज काय? त्यांनी पाठिंबा काढू नका म्हणून सोनियांना आश्र्वस्त केले. ते भाषण शिवसैनिकासाठी नाही, सोनियाजींना खुश करण्यासाठी होतं. असा हल्ला देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर चढवला.
आज देवेंद्रजी फडणवीस यांच्या आवाजाचा कर्कश भोंगा ऐकला !त्या भोंग्यातुन हनुमान चालीसा मधील चौपाई चा आधार घेत “पैसा” असा उल्लेख आला .रात्रंदिवस पैसा पैसा करणाऱ्या भाजपाच्या ह्या भरीव नेत्यांनी खरा अर्थ अगोदर समजून घ्यावा “रामदुआरे तुम रखवारे ! होत न आज्ञा बिनु पईसारे ll याचा अर्थ pic.twitter.com/PIZhB5RTxW
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 15, 2022
Read also:
- नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून जागतिक स्तरावर बदनाम करणार का? नितेश राणेंचा तिखट सवाल
- ‘हाच देवेंद्र तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही’; फडणवीसांचे थेट आव्हान
- “उताराला लागलेली गाडी अन् वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्याला ब्रेक लागणे कठीण”
- “वजनदार ने हल्के को, बस हल्के से ही वजन से, कल हल्का कर दिया”
- जवळपास 50 वकिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट ! मशिदीवरील भोंगा प्रकरण