मुंबई : राज्याच्या विधानसभेचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशनात, पहिल्या दिवशी ओबीसी आऱक्षणाचा ठराव मंजूर करताना, भाजप आमदारांनी वेलमध्ये येत गोंधळ घातला, घोषणाबाजी केली, अध्यक्षांच्या समोरील माईक ओढला. तसेच, याहीपुढे जाऊन, तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केली आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
“काल प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील; भाजपासून सावधान आणि सतर्क रहा!
यामुळे भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. हे कमी होते काय, म्हणून दुसऱ्या दिवशी भाजपकडून या घटनेचा निषेध म्हणून विधानसभेबाहेर सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन करत, प्रतिविधानसभा भरवण्यात आली. तसेच, कामकाजात अडथळा आणण्यासाठी आमदार रवी राणा यांनी तर थेट राजदंडच पळवला.
“या प्रस्थापितांच्या ‘पोपटाला’ लोकप्रतिनिधींचं निलंबन, हे १२-१९च्या आकड्यांचा खेळ वाटतोय”
दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी, खासदार-आमदार राणा जोडीवर ट्विट करून टीका केली असून, “बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले”, असा जोरदार हल्लबोल केला आहे. सर्वोच्च न्यायालायने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करुन त्यांना दणका दिला, तर काल विधिमंडळ अधिवेशनात आमदार रवी राणा यांनी अध्यक्षांसमोरचा राजदंड पळवला, या पार्श्वभूमीवर त्यांनी ही तिखट टीका केली आहे.
‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले#अधिवेशन
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 7, 2021
Read Also :
- “मग प्रकरण दडपण्यासाठी फडणवीसांची ईडीने चौकशी का करु नये?”
- राज्यातून ४ नेते मंत्रीपदी, एकूण ४३ मंत्र्यांची अधिकृत यादी जाहीर, वाचा एका क्लिकवर
- “अखेर काँग्रेसला हात दाखववून कृपाशंकर सिंग यांचा भाजपत प्रवेश, समीकरणे बदलणार
- अखेर रावसाहेब दानवेंची पडली विकेट; तब्बल १० मंत्र्यांचे राजीनामे
- “खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी चुकीची आणि खोटी, त्या मुंबईतच”