नागपुर : नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन नागपुर येथे होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहिल्या आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचे प्रश्न, समस्या मांडण्यासाठी ही संधी जाऊ नये म्हणून आपल्या अडीच वर्षाच्या बाळाला नागपुर अधिवेशनात आणावं लागलं अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यानंतर दिली.
“फडणवीसांनी राज्यपाल अन् आपल्या सहकाऱ्यांच्या बुद्धीची तपासणी करावी”, सेनेचा टोला
सरकार कुणाचंही असो ते शिंदेंचं किंवा आमचं ठाकरे सरकार असो.परंतु आपल्या मतदार संघातील प्रश्न सोडवण्यासाठी वातावरण कसंही असलं तरी आम्हाला अधिवेशनाला यावचं लागतं. असं म्हणत विधानसभेत अनेक महिला प्रतिनिधी आहेत. त्यांच्यावर कधी आपल्या बाळाला सोबत येण्याचा प्रसंग झाला तर पुढच्या अधिवेशनात तरी हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
“चंद्रकांत पाटलांनी घेतला शाई फेक प्रकरणाचा धसका, आता तोंडावर थेट फेसमास्क लावला”
तर राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या महापुरूषांच्या बदनामीकारक वक्तव्यवरून हिवाळी अधिवेशन गाजलं. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप अन् शिंदे गटाच्या आमदारांना महापुरूषांचं पुस्तक भेट दिलीत. विधानभवनात प्रवेश करतांना रोहित पवारांनी दरवाज्याजवळ राहून आमदारांना पुस्तक वाटप करण्यात आली.
Read also
- राजकारण तापलं..! “बोम्मई, ही सीमा हिंदुस्थानात आहे, पाकिस्तानात नाही” ; सेनेच्या नेत्याचा इशारा
- “मग अमित शहांसोबची चर्चा हे केवळ नाटक होतं का?” बेळगाव आंदोलन तापलं, मविआच्या नेत्यांना अटक
- “एकदम ओक्केच्या घोषणांनी विधानभवन पुन्हा दणादणाला, हिवाळी अधिवेशनाला वादळी सुरूवात”
- “एकनाथ शिंदें साहेब जागे व्हा, भाजपला तुमचं नेतृत्व मान्य नाही”
- सरकार आंधळ, बहिर, मुक,आणि पळकुट; महामोर्चात भुजबळांचा हल्लाबोल