पुणे : राष्ट्रवादी-भाजपत सध्या पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून खडाजंगी सुरु आहे. याला कारण म्हणजे पुणे महापालिकेच्या निवडणूका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी मेट्रो ट्रायलला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर, आता मेट्रोच्या कामकाजाची पाहणी फडणवीसांनी केली. त्यामुळे मेट्रोचे श्रेय घेण्याचा सध्या या दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न होताना दिसत आहे.
दरम्यान, यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मेट्रोच्या कामावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “पुणे मेट्रोची पाहणी करून हे काम आपणच केले असल्याचा दिखावा देवेंद्र फडणवीसांनी करू नये. पुण्याचा विकास हा फडणवीसांच्या सवडीनुसार नाही तर अजित पवारांच्या गतीने होणार आहे”, असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे.
मिसेस फडणवीसानंतर आता मिस्टर फडणवीस; पुणे मेट्रोच्या श्रेयासाठी मोदींच्या नावाची कुरघोडी?
आज फडणवीसांनी शिवाजीनगर परिसरातील मेट्रोच्या कामाची पाहणी केली. यावेळी, “श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे, त्यांच्या हस्ते ट्रायल रनचे उद्घाटन झाले. मात्र काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधानांच्या हस्तेच याचे उद्घाटन होणार आहे. त्याला कुणी विरोध करणार नाही. २०१६ ला मोदी सरकार आणि युती सरकारने या कामाला मंजुरी दिली होती. हा स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. मी महामेट्रोचे अभिनंदन करतो”, असं सांगितलं.
Read Also :
- “ही नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद”, पंतप्रधान मोदींवर काँग्रेसची बोचरी टीका
- शिवसेनेच्या मुखपत्रातून फोडला गेला राजकीय बॉम्ब, अजून एका ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाचे संकेत?
- २०२४ ला आमचं एकच इंजिन असणार; देवेंद्र फडणवीस यांच मोठं विधान
- भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाच्या कंड्या पेटवू नका; बातम्या कमी पडल्या तर मला मागा – देवेंद्र फडणवीस
- “चावी आपल्या हातात आहे अंदाज घेऊन फिरवू कशी फिरावायची” मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान