बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. बीडमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. आज जिल्ह्यात १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे.
“नाना पटोले लहान आहेत, त्यांच्यावर मी काय भाष्य करणार?”
दरम्यान, समर्थकांच्या भावना लक्षात घेता माजी मंत्री पंकजा मुंडे मंगळवारी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मंगळवारी समर्थकांशी चर्चा करुन, त्या आपली पुढची राजकीय वाटचाल ठरवण्याची शक्यता असून, शिवसेनेत जाण्याचा पर्याय त्या निवडू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शिवसेनेकडून ऑफर? उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रीया
त्यातच आता पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना झाल्या आहेत. त्या पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा करणार असून, या भेटीत आपली नाराजी नड्डा यांच्यासमोर व्यक्त करणार आहेत, असे असतानाच त्यांनी, आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. भाजप नेते विनोद तावेड व विजया रहाटकरही त्यांच्यासोबत असल्याचे समजते. त्यामुळे लवकरच मुंडे भगिनींना घेऊन भाजप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
भाजपला सर्वात मोठा धक्का! पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार, राजकीय चर्चेला उधान
दुसरीकडे, पंकजा यांच्या ४९ समर्थकांनी विविध पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंकजा यांनी समर्थकांची मुंबईत बैठक बोलावली आहे. त्यामुळे, भाजप आणि राज्याच्या राजकारणात लवकरच मोठी खळबळ पाहायला मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे
Read Also :
- “सत्तेत काँग्रेसला कुणी विचारत नाही आणि काँग्रेसमध्ये नाना पटोलेंना!”
- संजय राठोड यांचं होणार पुनर्वसन? मंत्री मंडळातल्या प्रवेशाबद्दल म्हणाले…
- सहकार हा विषय राज्य सरकारचाच, महाराष्ट्रात गंडांतर येणार नाही
- “गैरसमजात राहू नका, माझं तिकीट कुणीही कापू शकत नाही”
- “एकतर सगळे निर्बंध कायमचे काढून टाका किंवा संपूर्ण लॉकडाऊन करा!”