सध्या राज्याचा राजकारणात निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय नेत्यांचे दौरे आणि गाठीभेटींनीही वेग घेतला आहे. यानिमित्ताने भाजपा नेत्या पंकजा मुंडे एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. देवेंद्र फडणवीसांचा एक चांगला गुण आणि त्यांच्यासाठी कोणता सल्ला द्याल असे विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संयमी नेते आहेत. त्यांना काही वाटत असेल किंवा गैरसमज झाले असतील तर त्यांनी ते व्यक्त करायला हवेत. त्यांनी अशा गोष्टी मनात ठेवू नयेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
“प्रत्येक आमदारकीची निवडणुक आली की माझ्या नावाची चर्चा होते”; पंकजा मुंडे
काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनीही पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याविषयी सकारात्मक संकेत दिले होते. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे का? असा सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाणार? केंद्र सरकारकडून हालचाली सुरू
या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यावेळी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का, या प्रश्नावर मुंडे म्हणाल्या, अजिबात नाही. सध्या जे चालू आहे ते पाहता मी आहे तिथेच बरी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
“चंद्रकांत पाटील हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का”? संजय राऊत भडकले
दरम्यान, येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २, काँग्रेसचा एक आणि १० व्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपकडून पंकजा मुंडे यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंकजा मुंडेही या जबाबदारीसाठी इच्छूक आहेत. मला विधान परिषदेवर पाठवावं, ही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होत्या.
Read also:
- भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून तिसरा उमेदवार काढून घेणार ; जयंत पाटील
- “निवडणुक झाली तर स्वागत नाही तर डबल स्वागत”; राज्यसभेच्या निवडणुकीबाबत राऊतांचं सुचक वक्तव्य
- “काॅंग्रेसकडून प्रतापगढ़ींना राज्यसभेची उमेदवारी जाहीर”; पटोले म्हणाले, “कोणीही नाराज नाही”
- राज्यसभेसाठी भाजपने तिसरा उमेदवार म्हणून धनंजय महाडिकांची निवड का केली?.. वाचा सविस्तर..
- ‘भाजपने संभाजीराजे यांना फसवलं,स्वार्थासाठी संभाजीराजेंची ढाल केली’, राऊतांचा निशाणा