मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, बारामतीतील जवळपास ३ हजार ४०८ वर्ग मीटर जमीन अनधिकृतपणे हडपल्याचा आरोप, याचिकेतून त्यांच्यावर करण्यात आला आहे, सोबतच नियमांचं उल्लंघन करून अजित पवार यांनी ही जमीन ९९ वर्षांच्या लीजवर जवळच्या नगरसेवकाच्या ट्रस्टला देण्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे.
संभाजीराजेंसह शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट, नेमकी काय चर्चा झाली? वाचा सविस्तर
दरम्यान, सदर जमीन ही गतीमंद मुलांच्या शाळेसाठी आरक्षित आहे. मात्र, त्यावर मल्टिप्लेक्स बनवण्याचा घाट घातला जात असल्याचे वृत्त आहे. आता या प्रकरणाची लवकरच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, एकीकडे हे असताना दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमैय्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सांताक्रुझमध्ये असलेल्या इमारतीशी भुजबळांचा संबंध काय?” असा सवाल त्यांनी केला आहे.
फास आणखी आवळला, देशमुखांचे वकिल आणि तिवारी यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी
तसेच, २०१३ मध्ये ‘आर्मस्ट्राँग’ची मी पाहणी केली असता, भुजबळांच्या गुंडांनी आम्हाला अडवलं. आज पुन्हा आम्ही पाहणी केली. तेव्हा ‘आर्मस्ट्राँग इन्फ्रा’, ‘आर्मस्ट्राँग एनर्जी’ने मालेगाव मधली ‘गिरणा शुगर मिल’ विकत घेतली आहे. ही मिल भुजबळांची दुसरी बेनामी मालमत्ता असून, यात जो पैसा आला तो कुठून आला? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माझं चॅलेंज आहे, त्यांनी भुजबळांच्या इमारतीचे मालक कोण सांगावे,” असं आव्हान दिलं आहे.
“शिवसेनेला मराठवाडा-विदर्भात भाजपने वाढवलं”, चंद्रकांत पाटलांचं विधान
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवतीचा फास आवळला जात असल्याचे दिसत असून, १०० कोटींच्या वसुलीच्या गंभीर आरोपावरून त्यांची सीबीआय आणि ईडी या दोन केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने देशमुखांना दणका दिल्यांनतर उच्च न्यायालयानेही समन्स रद्द करण्याच्या देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
Read Also :
- १२ आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याच्या चर्चेवर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया
- विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – विनायक मेटे
- “त्यावेळी कुठे गेला कायदा? नवाब मलिकजी…”, CBI च्या कारवाईवरून भाजप-राष्ट्रवादीत वाक्युद्ध
- काही नावांवर राज्यपालांचा आक्षेप, आता अजित पवारांनी केले राजू शेट्टींच्या आमदारकीवर भाष्य
- महाराष्ट्रात पुन्हा Lockdown? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती