पुणे : पुण्यातील मनसेचे डॉंशिंग नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रूपेश मोरे याचा बनावट विवाह प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहेत. त्याच्या आधारे खंडणीखोरांनी एका पत्राद्वारे खंडणी मागितली आहे. त्यामुळे सध्या पुण्यात राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली असून पत्र पाठवणाऱ्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
हेही वाचा…भाजप आमदाराच्या पुत्राचा मोठा कारनामा..! सकाळीच धाड अन् 6 कोटीची रोकड जप्त
वसंत मोरे यांचा मुलगा रूपेश मोरे यांचा बनावट विवाह प्रमाणपत्र तयार करण्यात आला आहे. या प्रमाणपत्राचा गैरवापर केला जाईल अशी धमकी देत खंडणीखोरांनी त्याच्याबदल्यात ३० लाख रूपयाची खंडणी मागितली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अल्पिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज करून रूपेश मोरे यांच्याकडून ३० लाख रूपयांची खंडणी मागण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा..Good News : पिंपरी-चिंचवडकरांचा शास्तीकर पूर्ण माफीचा ‘जीआर’ अखेर आला !राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ‘शब्द’ पाळला
अल्पिया शेख हिच्या नावाने पाठवण्यात आलेल्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, तुम्ही ३० लाख रूपये द्या, अन्यथा रूपेश मोरे यांना गोळ्या घालून ठार करण्यात येईल. अशी धमकी देण्यात आली आहे.
हेही वाचा..पहाटेच्या शपथविधीबाबत थोड्याच गोष्टी सांगितल्या, सगळ्या सांगतील तेव्हा… शिंदेंनी सभागृहात राजकीय बॉम्ब टाकला
दरम्यान, या अगोदर देखील वसंत मोरे यांच्या मुलला जीवे ठार मारण्याची धमकी आली होती. वसंत मोरे यांच्या गाडीत एका कागदावर रूपेश मोरे यांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर वसंत मोरे यांनी फेसबुकवर या प्रकरणाबाबत सविस्तर पोस्ट लिहित धमकी देणाऱ्या व्यक्तीला कडक शब्दात इशारा दिला होता. तसेच त्यांनी त्याला भावनिक आवाहनही केलं होतं. यातच आता पुन्हा जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने पोलीस काय कारवाई करणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- हेही वाचा…“तो हल्ला राजकीय नाही तर..” आमदार डॉ. प्रज्ञा सातव हल्ल्याप्रकरणातील आली मोठी माहिती
- हेही वाचा..“मी घटनाबाह्य वागणाऱ्या संस्थेला शिवी दिली हा उद्रेक”, संजय राऊतांचं स्पष्टीकरण
- हेही वाचा..“भाजपला चोपायची ‘ही’ संधी मला सोडायची नाही, शरद पवारांची भेट घेऊन..” अमोल मिटकरींनी भाजपला दिला इशारा
- हेही वाचा..“नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे लागले कामाला..! ठाकरेंच्या नव्या शिवसेनेचा प्लॅन ठरला..
- हेही वाचा.“एकनाथ शिंदेंनी मविआ सरकारची कुंडलीच वाचली,” राणे, कंगना, राणा, सगळंच सांगितलं