पुणे: पुण्याचे शिल्पकार कोण, या श्रेयवादावरून सध्या पुण्यात मोठी पोस्टरबाजी सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते म्हणतात “फडणवीस पुण्याचे शिल्पकार”! तर अजित पवार यांचे कार्यकर्ते म्हणतात “अजित पवार पुण्याचे शिल्पकार!” फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाने तर अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरात जोरदार बॅनरबाजी केली आहे. येत्या सहा महिन्यात महापालिकेच्या निवडणुका असल्याने आपला नेता किती पावरफुल आहे, हे दाखवण्यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जणू स्पर्धा लागली आहे.
हे पण वाचा: राज्याला लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नको, नारायण राणे यांची खोचक टीका
या वादात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. पुण्याचा खरा विकास हा अजित पवार यांनी केला आहे, असे म्हणत आज जो काही पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा विकास दिसतोय त्याला कारणीभूत आहेत माननीय अजितदादा!, असा दावा केला आहे.
बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो. हे पुणे आहे. बॅनर लावणाऱ्यांनी जगाला ज्ञान द्यावं, पण पुणेकरांना ज्ञान देण्याच्या भानगडीत पडून हाताने हसू करून घेऊ नये.https://t.co/CoIe9ksrRc pic.twitter.com/9apP4VdG0m
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 22, 2021
हे पण वाचा: निलंबनाच्या कारवाईविरोधात भाजपच्या १२ आमदारांनी उचलले मोठे पाऊल
“राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार सत्तेत असताना आणि महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना पुणे शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला. आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना राज्यात सगळ्या विभागासाठी भरीव निधी दिलाच पण जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी निधी देताना अजितदादांनी कधीच हातचं राखून ठेवलं नाही. त्याचीच परिणीती आज पुणे शहराच्या विकासात दिसतेय.
हे पण वाचा: “दूध का दूध पानी का पानी”, केंद्राने राज्यांना दिले इतक्या कोटींचे डोस
भाजपच्या नेत्यांनी लक्षात घ्यावं, की पुणे हे नवं कधीच नव्हतं. पुण्याला मोठा आणि अभिमान वाटावा असा इतिहास आहे. आदरणीय पवार साहेबांनी मुख्यमंत्री असतानाच्या काळात पुणे, पिंपरी-चिंचवडला आयटी हब, ऑटोमोबाईल हब अशी ओळख निर्माण करून देऊन जगाच्या नकाशावर आणलं आणि अजितदादांनी ही ओळख अधिक दृढ केली. आजही पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्यावर तिथला विकास, रस्ते, गार्डन हे सर्व पाहून परदेशात गेल्याचा फिल येतो, यामागे अजितदादांनी घेतलेली मेहनत आहे. असं असताना ‘नव पुण्याचे शिल्पकार’ अशी जाहिरातबाजी करायला त्यांच्या कार्यकर्त्यांना काहीच कसं वाटंत नाही?
हे पण वाचा: देशात ऑक्सिजनअभावी मृत्यू नाही, तर मग हे काय? रोहित पवार म्हणतात….
आज पेट्रोल- डिझेल, खाद्यतेल याचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईने सामान्य माणसाचं कंबरडं मोडलंय. असं असतानाही याविरोधात एखादा फ्लेक्स लावला असता तर सामान्य माणसासोबतच माझ्यासारख्यानेही त्याचं स्वागत केलं असतं. पण फक्त बॅनरबाजी आणि फ्लेक्सबाजी करुन हवेत विकास करण्याची सवय असलेल्या भाजपकडून अशी अपेक्षाही करणं चुकीचं आहे!
Read Also :
- राज्याला लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नको, नारायण राणे यांची खोचक टीका
- सांगली पालिकेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन, कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर
- “लोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे”च्या घोषणा देत काँग्रेसने दणाणून सोडले राजभवन
- अनिश्चित काळासाठी सर्वसामान्यांना बंद ठेवणार आहात? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल
- मुख्यमंत्र्यांनी घेतला चिपळूणच्या महापुराचा आढावा, यंत्रणांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे आदेश