पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची पुन्हा एकदा तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता पुढील सभेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. 21 ते 28 मे च्या दरम्यान ही सभा पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. या सभेसाठी परवानगी मिळावी यासाठी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना पत्र देखील लिहिले आहे.
त्यांच्यासोबत मतभेद जरूर आहेत, मात्र अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चुक, यांचा छडा लावा; राज ठाकरे
औरंगाबादेत विराट सभा झाल्यानंतर आता पुण्यातही सभा घेऊन शक्तीप्रदर्शन करतील. महापालिका निवडणुकांच्या धर्तीवर ही सभा महत्वाची मानली जात असून, पुन्हा एकदा मनसेचा भोंगा या सभेत वाजणार आहे. गुडीपाडव्याला राज ठाकरेंची शिवाजी पार्क मैदानावर सभा झाली. त्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका झाली. या टीकेला उत्तर देण्यासाठी उत्तर सभा ठाण्यात त्यांनी घेतली. त्यानंतर एक मे रोजी महाराष्ट्र आणि कामगार दिनी औरंगाबादेत त्यांनी सभा घेतली. या सभेला सर्वदुरहून कार्यकर्ते आणि नागरीक आले होते. आता पुण्यात पुन्हा सभा गाजणार
अखेर केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात; जितेंद्र आव्हाडांनी मानले पोलिसांचे आभार
राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसाठी पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सर परशुराम महाविद्यालयाच्या (एसपी कॉलेज) मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. पुण्याच्या या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलतात आणि काय विधाने करतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहे. औरंगाबाद येथे झालेल्या सभेतच राज ठाकरे यापुढे सर्व सभा मराठवाड्यात घेणार आहे. विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही सभा घेणार आहे. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे.
Read also:
- ”गेल्या अडीच वर्षात NCP कडून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न”; राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत नाना पटोलेंची थेट हायकमांडकडे तक्रार
- नाना पटोलेंची राष्ट्रवादीविरोधात तक्रार; भाजप नेते म्हणाले की, “नाना पटोलेंचं वक्तव्य मूर्खपणाचं लक्षण”
- 2024 चा मुख्यमंत्री ब्राम्हण समाजाचा असावा; रावसाहेब दानवेंनंतर आठवलेंचं वक्तव्य
- “आहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत आधी त्यांना पहा”, चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांवर पलटवार
- आरोग्यमंत्र्यांनी दाखवली संवेदनशीलता; अपघातग्रस्तच्या मदतीला आले धावून; व्हिडीओ व्हायरल