मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उशिरा झाला. आता पुढील मंत्रिमंडळाचा विस्तार 15 सप्टेंबर अगोदर होणार असून त्या मंत्रिमंडळात आरपीआयला पक्षाला एक मंत्रिपद मिळालं पाहिजे. अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. दुसऱ्या टप्प्यात मंत्रिमंडळाचा विस्तारामध्ये सगळ्यांचा विचार केला जाईल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिलं असल्याचंही रामदास आठवले म्हणाले.
“फडणवीसांचा ‘सागर बंगला’ हा वॉशिंग मशीनचं काम करत आहे”
तसेच विधान परिषदमध्ये 12 आमदारांची निवड अजून प्रलंबित असून त्यात देखील आम्हाला एक आमदार सदस्य म्हणून द्यायला हवं. त्याचबरोबर राज्यातील एक ते तीन महामंडळ देखील मिळावी. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या लवकरात लवकर घ्याव्यात यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेणार असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.
50-50 चलो गुवाहटी..गद्दारांना ताट-वाटी..चलो गुवाहाटी; सलग दुसऱ्या दिवशीही विरोधकांची घोषणाबाजी
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात 20 मंत्र्यांना खातीवाटप करण्यात आली आहे. यामध्ये अपक्ष आमदार आणि महिलांचा समावेश न केल्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर प्रखरपणे टिका केली. तसेच या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर काही अपक्ष आमदार नाराज असल्याचंही देखील बोलण्यात येत होतं. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी तर आपली नाराजी उघडपणे बोलून देखील दाखवली होती.
“तुम्ही हजार कोटी घेतलेत, ते घेत असताना तुम्ही नामर्द होते का?” अन् बचू कडू संतापले
दरम्यान, तसेच एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भाजपनेच महत्वाची खाती घेतल्याचा आरोप विरोधपक्षांनी केला आहे. त्यावरून राज्यात विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांवर टिकास्त्र सोडलं होतं. यातच आता दुसऱ्या टप्प्यात कुणाला संधी मिळणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “ठाणे मुख्यमंत्र्यांचे घर आहे, पण राजकीय इतर खड्डे कोण बुजवणार?”; एकनाथ खडसे
- “विरोधकांनी पायऱ्यावर गोंधळ करण्यापेक्षा सभागृहात जनतेचे प्रश्न मांडावेत”; धैयशिलराव माने
- “गुलाबराव आपण खाली बसा, इथे तुमचा काय संबंध?”; अन् सभागृहात निलम गोऱ्हे संतापल्या
- “काळी दाढी अन् पांढरी दाढी”; भुजबळांची नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी
- “आता फक्त भाषणावर जीएसटी लावायची बाकी आहे” ; छगन भुजबळांचा केंद्रावर निशाणा