IMPIMP
Rape of former corporator in Pune Rape of former corporator in Pune

“पुण्यात माजी नगरसेविकेवर बलात्कार, दोषी नराधमांवर कठोर कारवाई करा,” राष्ट्रवादीची मागणी

पुणे : मैत्री संबंधातून काढलेली छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन एका माजी नगरसेविकेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी एका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे विद्येच्या माहेरघरात लोकप्रतिनिधीच अशा घटनांमध्ये सापडत आहेत तर सर्वसामान्य लोकांचं काय होत असेल ? असा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. यावरून आता राष्ट्रवादीने आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा…शरद पवार गटाकडून ‘हा’ बडा वकिल युक्तिवाद करणार, शरद पवारांची रणनीती तयार 

पुण्यात एका माजी नगरसेविकेला ब्लॅकमेल करुन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानिमित्ताने राज्यातील महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात अशी घटना घडणे ही राज्याला शरमेने मान खाली करायला लावणारी बाब आहे. माजी महिला लोकप्रतिनिधिंचीच अब्रू व सुरक्षा अशाप्रकारे वाऱ्यावर असेल तर इतरांचा विचार न केलेलाच बरा. राज्य सरकारसह महिला आयोगानेदेखील याची गांभीर्याने दखल घेत संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषी नराधमांवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

हेही वाचा…पुण्यात माजी नगरसेविकेला धमकावून बलात्कार, आरोपीने नगरसेविकेकडून दहा लाख रूपयेही उकळले 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित माजी नगरसेविकाने सचिन मच्छिंद्र काकडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी काकडे आणि पीडित नगरसेविकेचे खुप दिवसापासून मैत्री संबंध होते. समाजमाध्यमात छायाचित्रे, ध्वनिचित्रफित प्रसारीत करण्याची धमकी काकडे याने तिला दिली. त्यानंतर त्याने धमकावरून नगरसेविकेवर वेळोवेळी बलात्कार केला. सन २०१७ पासून नगरसेविकेला धमकावून काकडे यांनी अत्याचार केले होते. यासोबत पीडिताकडून दहा लाख रूपये देखील उकळले असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा…लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली, जागा वाटपासाठी समिती स्थापन, ‘या’ नेत्यांचा समावेश 

दोन दिवसांपुर्वी काकडे तिच्या घरी आहे. तु दुसरा विवाह केला आहे. तुझ्यामुळे माझी पत्नी सोडून गेली आहे, असे सांगून त्याने पीडित नगरसेविकेला मारहाण केली. अखेर काकडेच्या त्रासाला कंटाळून तिने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेतली. यापुढील तपास आता पोलीस उपनिरीक्षक सचिन निकाळजे करीत आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“आधी महत्वाची खाती काढली अन् आता पुण्याचं पालकमंत्री, चंद्रकांत दादांचं डीमोशन बघवत नाही हो ,” 

हेही वाचा…“भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफजल खानासारखी मिठी मारतो”, मित्र पक्षाचा गंभीर आरोप 

हेही वाचा… रोहित पवारांच्या ‘युवा संघर्ष यात्रे’ने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणणार, १३ जिल्ह्यातून जाणारी यात्रा भाजपच्या महाविजय २०२४ ला खिंडार पाडत जाणार 

हेही वाचा…“५६ वर्षात शरद पवार एकही निवडणुक हरले नाहीत, ” सुप्रिया सुळेंनी सांगितलं रहस्य, म्हणाल्या.., 

हेही वाचा…आली समीप घटिका..! एकनाथ शिंदें दिल्लीला तात्काळ रवाना