मुंबई : राज्यात एका बाजूला महाविकास आघाडी सरकार कोसळण्याचं संकट असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांना आता इडीची नोटीस आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता शिवसेनेला दुहेरी धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांना उद्या ११ वाजता इडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवलं असल्याची माहिती समोर आली आहे.
काय ती झाडी, काय तो डोंगर, म्हणणाऱ्या बंडखोर आमदाराला राऊतांनी फटकारलं
संजय राऊतांवर मागील काही काळात 1 हजार 38 कोटी रुपयांच्या कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने एकूण 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचं म्हटलं आहे. म्हाडाने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारावर ईडीने याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. यात गुरुआशिष कंपनी, सारंग वाधवान, राकेश कुमार वाधवान यांचाही समावेश असल्याचं ईडीने म्हटलं आहे.
बंडखोर आमदारांची सुरत, गुवाहाटीवरून आता गोव्यात स्वारी; भाजपच्या 3 नेत्यांकडे जबाबदारी ?
प्रवीण राऊत, सारंग वाधवान आणि राकेश वाधवान गुरुआशिष कंपनीचे संचालक असताना पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू झाले म्हणून या तिघांविरोधात ईडीने तपास सुरू केला. गुरूआशिष कंपनीच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून 9 त्रयस्त बिल्डरांना FSI विकला आणि त्यातून 901 कोटी रुपये कमवले. तसंच रहिवाशांची घरंही बांधली नाहीत असं ईडीचं म्हणणं आहे. प्रवीण राऊत यांच्या पत्नी स्वप्ना राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात 2010 साली 55 लाख रुपये ट्रांसफर झाल्याचं ईडीने म्हटलं आहे. हेच 55 लाख संजय राऊत यांनी परत केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. असं बीबीसी मराठीने देखील बातमी दिली होती.
पत्रकारांना चकवा देत ‘एकनाथ शिंदे’ काल गुजरातमध्ये; फडणवीससोबत चर्चा झाल्याची माहिती
पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरणात ईडीने संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. 1 फेब्रुवाराला ईडीने सात ठिकाणी झडती घेतल्यानंतर 2 फेब्रुवारीला ईडीने प्रवीण राऊत यांना ताब्यात घेतलं. ईडीने आपल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, प्रवीण राऊत यांच्या जमिनी, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि वर्षा राऊत,स्वप्ना पाटकर यांच्या अलिबाग येथील जमिनी ताब्यात घेतल्या आहेत.
Read also:
- “बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात राऊतांच्या इशारा देणाऱ्या भाषणाच्या लिंक दिल्या”
- ब्रेकिंग..! बंडखोर 39 शिवसेना आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला
- बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला लावून बसताना याचना होत नाहीत का?
- शिंदे गटाच्या वकिलाची फी एका दिवसाची तब्बल ३० लाख; ठाकरे अन् शिंदे गटाची न्यायालयात सुनावणी
- “राणा बाई थोडी कळ काढा, हि शिवसेनेची शाळा आहे, सुट्टीवर गेलेली पोर परत येतील”