मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आल्या असताना पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून आंदोलन छेडलं होतं. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने पुण्यातील बालगंधर्व सभागृहात मोठा राडा झाला. यावेळी राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या पदाधिकारी वैशाली नागवडे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप झाला. त्यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झालं आहे.
“शिवसंपर्क अभियान नव्हतं तर शिव्या संपर्क भाषण होतं”
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात निदर्शनं करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण निंदनीय आहे. प्रभू श्रीराम आणि हनुमानाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी सीतेविषयी देखील आदर निर्माण करणे गरजेचे आहे. राजकारण बाजूला ठेवून या घटनेकडे गंभीरतेने सर्व पक्षांनी पाहणे अतिशय आवश्यक आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जातीने या प्रकरणात लक्ष घालून आपल्या कार्यकर्त्यांना लगाम घालावी. या घटनेची चौकशी करत दोषी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
“यांना रावणांची देखील उपमा देऊ शकत नाही”, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टिका
गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे. भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे. अस राष्ट्रवादी काॅंग्रसेच्या आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शांततेच्या मार्गाने महागाईच्या विरोधात आपला विरोध प्रकट करीत असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी वैशाली नागवडे यांना भाजपाच्या पुरुष पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत एक पुरुष महिलेला मारहाण करतो हे अजिबात स्वीकारार्ह नाही. असं राष्ट्रवादी काॅंग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
Read also:
- ममता दीदींच्या पावलावर ठाकरे सरकारचे पाऊलं; केंद्र सरकारच्या विरूद्ध धडक कृती मोहीम
- “महागाईमुळे सध्या आमच्या घरात लिंबू सरबत बनतच नाही”; सुप्रिया सुळे
- ज्या ठिकाणी पाऊस होणार नाही, तिथे निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- ‘…आणि म्हणूनच धर्मवीर चित्रपटाचा शेवट उद्धव ठाकरेंनी पाहिला नाही’; नितेश राणेंची खोचक टीका
- क्योंकी गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद है ना; स्मृती इराणीविरोधात राष्ट्रवादीचा मोठा राडा