अहमदनगर : भाजप आमदार महेश लांडगे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील आज बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. महाराष्ट्र केशरी बैलगाडा ही स्पर्धा अहमदनगर मधील कर्जत याठिकाणी होत आहे. जास्तीच जास्त बैलगाडा मालिकांनी या स्पर्धेत भाग घ्यावं. अंस रोहित पवारांनी काल आवाहान केलं होतं. त्यामुळे आज मोठ्या संख्येने ही बैलगाडा शर्यत बघण्यासाठी लोकांची उपस्थिती आहे.
“विलास लांडे यांनी कावेबाज लोकांना ओळखावे अन् पुन्हा फिनिक्स भरारी घ्यावी”
चिखली याठिकाणी झालेल्या बैलगाडा शर्यतीनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी मोठं बक्षिस जाहीर केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की ज्यावेळी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, त्यादिवशी आम्ही बैलगाडा शर्यतीत मर्सिडीज कार बक्षिस देऊ, याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, तुम्ही बक्षिस द्या , मर्सिडीज द्या, विमान द्या, परंतु व्यासपीठ द्या. उगाचच उद्या मुख्यमंत्री झाल्यावर हे करण्यापेक्षा, किंवा बोलण्यापेक्षा आज तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे, असा टोला ही त्यांनी लगावला.
“मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल”; करूणा शर्माच्या दाव्याने खळबळ
हा अराजकीय कार्यक्रम आहे. तसेच कुणीही संस्कृतीचं राजकारण करू नये. असंही ते म्हणाले, त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र ठिकाणी येऊन त्यांनी राजकीय भाषणं केलीत. तसेच त्याठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या घोषणा करायच्या सोडून त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजकीय घोषणा दिल्यात. त्यामुळे काही लोक पोलीस ठाण्यात जाऊन गोपीचंद पडळकर यांच्यावर तक्रार केली असल्याची माहिती आहे.
“हिमालय संकटात होता, तेव्हा त्याच्या मदतीला ‘सह्याद्री’ धावून आला, तसेच काॅंग्रेसलाही..;” नाना पटोले
महाराष्ट्रातील अनेक लोकांनी आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे. पुसेगाव येथील ग्रामस्थांनी बैलगाडा शर्यतीसाठी मदत केली असून आतापर्यंत 300 पेक्षा जास्त बैलगाडा मालक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. नगर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी बैलगाडा शर्यत होत असून अनेक लोक याठिकाणी येणार आहेत. असंही ते म्हणाले.
Read also:
- राज्यसभा निवडणूकिसाठी फडणवीसांची मोर्चेबांधणी, अपक्ष आमदरांना गळाला लावणार?
- राज्यसभा निवडणुक; नवाब मलिक, अनिल देशमुखांसाठी अजित पवार न्यायालयात जाणार ?
- “संभाजीनगरच्या”टोमणे सभेत”ढोंगी हिंदुत्ववादी उत्तर देणार का?” सभेआधी मुख्यमंत्र्यांना मनसेने डिवचलं
- “मोदींच्या नेतृत्वाखाली एक छोटासा सैनिक म्हणून काम करणार”; हार्दिक पटेल
- भाजपने आयोजित केलेल्या स्पर्धेत ‘राष्ट्रवादीचा जलवा’ ; आमदार सुनील शेळकेंनी जिंकली 12 लाखांची बोलेरो