मुंबई : गेल्या काही दिसवापांसून महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठीमागे लागला आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी ईडीने छापे टाकले. अशातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीन दुसऱ्यांदा छापा टाकला आहे. त्यामुळेे राज्यात आता राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. त्यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पेनड्राईव्हची फॅक्टरी यांनी काढली आहे का? संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
प्रतापसनाईक म्हणाले की, गेल्या वर्षी मी कंगना रणावत आणि अर्णव गोस्वामी यांच्यावर हक्कभंग आणल्यानंतर माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संघर्षात पहिल्यांदा माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. त्यामुळे माझी ही न्यायालयीन लढाई सुरूच ठेवेन. सर्वाच्च न्यायालयानं संरक्षण दिल्यानंतर मी ईडीच्या कार्यालयाला सहकार्य केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची रंगत वाढली; निवडणुकीसाठी तब्ब्ल २७ अर्ज दाखल
ईडीने हिरानंदनी येथील घर आणि मिरा रोड येथील भूखंड जप्त केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांसंदर्भात मला व माझ्या कुटुंबीयांना इडीने नोटीस देखील पाठवली होती. त्यानंतर त्या नोटीसला मी कायदेशीर प्रक्रियेने उत्तर देत आहे. 24 नोव्हेंबर 2020 रोजी माझ्यावर अशीच प्रकारे कारवाई झाली होती. मला असं वाटतं की राज्यातील सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून पहिलीच कारवाई होती. असंही ते म्हणाले.
“माझ्या शरीरात इंक टाकून हत्येचा कट रचला”; विधानसभेत नितेश राणेंचे सरकारवर धक्कादायक आरोप
दरम्यान, आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून जवळपास 11.36 कोटींची संपत्ती जप्त केल्याची माहिती मिळत आहे. ही सगळी संपत्ती ही ठाण्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर इडीची कारवाई सुरू आहे.
Read also:
- राणे कुटुंबियांवर कारवाई न केल्यास आत्महत्या करू; दिशा सलियनच्या आईचे राष्ट्रपतींना पत्र
- “वडिलांना दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला”; सदाभाऊ खोतांनी मानले फडणवीसांचे आभार ;
- प्रताप सरनाईक यांना इडीचा दणका; कारवाई करत 11.36 कोटींची संपत्ती जप्त
- स्वाभिमान पक्षाचे एकमेव आमदाराची पक्षातून हाकलपट्टी; कार्यकर्त्यांचा ढोल वाजवत आनंद साजरा
- टेस्ट जरी भाजपची असली तरी बेबी तुमच्याच नावाची; राऊतांच्या वक्तव्याला राणांची मिश्कील टिप्पणी