मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येनंतर शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. भाजपकडून हा मुद्दा अत्यंत आक्रमकतेने उचलून धरला होता आणि अद्यापही हा मुद्दा तितक्याच आक्रमकतेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कुटुंबियांकडून धरून ठेवला जात आहे.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची रंगत वाढली; निवडणुकीसाठी तब्ब्ल २७ अर्ज दाखल
फक्त सुशांतसिंह राजपूत प्रकरणचं नाही तर त्याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या आत्महत्येप्रकरणी देखील राणे कुटुंबीयांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दिशा सलियनला अत्याचार करून नंतर मारून टाकण्यात आलं होतं असा आरोप आमदार नितेश राणे यांनी काल विधिमंडळात केला आणि यासंदर्भात एक पेनड्राइव्ह पुरावा स्वरुपात त्यांनी सादर केला आहे.
“माझ्या शरीरात इंक टाकून हत्येचा कट रचला”; विधानसभेत नितेश राणेंचे सरकारवर धक्कादायक आरोप
यानंतर आता दिशा सलियनच्या आईने थेट राष्ट्रपतींना पत्रव्यवहार करून मुलीची बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध कारवाई करा, असं विनंतीदर्शक पत्र लिहलं आहे. दिशा सालियनची आई वासंती सॅलियान यांनी यापूर्वीही राजकीय नेत्यांना मुलीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याचे आवाहन केले आहे होते. मात्र राणे कुटुंबीय हे वारंवार ते प्रकरण उकरून काढत आहेत आणि दिशाची बदनामी करत आहेत. याविरोधात काही दिवसांपूर्वी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती.
कोणीही ऐरे गैऱ्यांनी मागणी करून नार्को टेस्ट होत नाही; चित्रा वाघ यांचा चाकणकरांना टोला
मी माझ्या मुलीला गमावलं आहे. हे राजकारणी लोकं आता आमची बदनामी करत आहेत. त्यांच्या राजकारणासाठी माझ्या मुलीच्या नावाचा वापर केला जात आहे. हे थांबायला हवं. आम्हाला शांततेत जगू द्या, अशी आर्त हाक दिशा सलियनच्या आईने दिली आहे. आता राणेंवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- “वडिलांना दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला”; सदाभाऊ खोतांनी मानले फडणवीसांचे आभार ;
- प्रताप सरनाईक यांना इडीचा दणका; कारवाई करत 11.36 कोटींची संपत्ती जप्त
- स्वाभिमान पक्षाचे एकमेव आमदाराची पक्षातून हाकलपट्टी; कार्यकर्त्यांचा ढोल वाजवत आनंद साजरा
- टेस्ट जरी भाजपची असली तरी बेबी तुमच्याच नावाची; राऊतांच्या वक्तव्याला राणांची मिश्कील टिप्पणी
- पेनड्राईव्हची फॅक्टरी यांनी काढली आहे का? संजय राऊतांचा फडणवीसांना टोला